मुंबई : राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी दोन गट पडले आहेत. एक अजितदादा गट व शरद पवार गट. राष्ट्रवादी फोडण्याचे कोणी काम केले. यावरुन खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण❓
महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही!#लढायचंय_जिंकायचय #महाराष्ट्र_साहेबांसोबत #आम्ही_साहेबांसोबत #शरदपवार #SharadPawar #AmolKolhe #अमोल_कोल्हे #Maharashtra@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi… pic.twitter.com/bv5b06DIX9— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 11, 2023
शकुनीमामा कोण?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी ट्विट करत, सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “मिठाचा खडा टाकणारा शकुनीमामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही”, अशा सूचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. परंतु त्यांचा रोख सत्ताधारी नेत्याकडे आहे, अर्थात जर इतिहास पाहिला तर शिवसेनेत देखील फूट पाडण्यात ज्यांचा वाटा आहे, त्यांनीच राष्ट्रवादीच फूट पाडली. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश कोल्हे यांचे आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट
मागील वर्षी शिवसेनेत मोठी फूट पडली. ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केले. यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्या अजित पवार आपल्या सहकारी आमदारांसह शिवसेना – भाजप सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनीमामा कोण यावर चर्चा होत आहेत. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील शकुनीमामा कोण? असे सूचक विधान करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.