भिगवण : भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने (Youth Suicide) रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २७) सकाळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी वर्गावर शोककळा पसरली आहे.
सुनील पांडुरंग कुचेकर (वय २२) असे या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. सुनील हा भिगवण येथील मुख्य बाजारात पानाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. सुनीलच्या मागे त्याची पत्नी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे. सुनीलच्या वडिलांचे २००४ साली किडनीच्या आजाराने निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात भिगवण व्यापारी मित्रांनी वर्गणी करून त्यांचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र, यातून त्यांना वाचविण्यात यश आले नव्हते.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
वडिलानंतर सुनील हा त्यांचा व्यवसाय पुढे चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता. महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. मात्र, त्याच्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






