(फोटो सौजन्य-AI एआय)
लग्नाला जवळपास 2 वर्षे झाल्यानंतर हे दाम्पत्य कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पत्नीच्या वैद्यकीय तपासण्या सामान्य आल्यानंतर डॉक्टरांनी पतीच्या प्रजननक्षमतेची तपासणी केली. तपासणीत त्याच्या शरीरात दोन्ही वृषण त्यांच्या नेहमीच्या जागी नसल्याचे समोर आले.
वीर्य तपासणीत अॅझूस्पर्मिया म्हणजेच वीर्यामध्ये शुक्राणू नसल्याचे आढळले. टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्य असली, तरी FSH आणि LH हार्मोन्सचे प्रमाण वाढलेले होते. त्यानंतर अल्ट्रासाऊंडमध्ये पोटाच्या खालच्या भागात असामान्य रचना दिसली आणि अधिक स्पष्ट माहिती मिळवण्यासाठी MRI करण्यात आला.
MRI अहवालाने या प्रकरणाचे गूढ उलगडले. रुग्णाच्या पोटात विकसित झालेले गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारख्या रचना आढळल्या. पुढील तपासणीत त्याचा गुणसूत्र नमुना 46,XY असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या मते, या रुग्णाला Persistent Müllerian Duct Syndrome (PMDS) हा जन्मजात आणि अत्यंत दुर्मीळ विकार होता.
कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला ठरेल गेमचेंजर
PMDS मध्ये पुरुष भ्रूणाच्या विकासादरम्यान Anti-Müllerian Hormone (AMH) किंवा त्याच्या रिसेप्टरमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूबसारख्या रचना शरीरात टिकून राहू शकतात. या प्रकरणात शस्त्रक्रिया करण्यात आली. काढलेल्या ऊतकांच्या तपासणीत एका वृषणामध्ये कर्करोगपूर्व बदल आढळले, त्यामुळे वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे ठरले.






