(फोटो सौजन्य-AI एआय)
Toyota Innova Hycross Facelift भारतात 25 नोव्हेंबर 2026 रोजी लाँच होणार आहे. टोयोटाने आपल्या प्रीमियम MPV च्या नव्या मॉडेलची तारीख जाहीर केली असून, या गाडीमध्ये एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये जास्त बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2022 च्या अखेरीस भारतीय मार्केटमध्ये दाखल झालेल्या इनोव्हा हायक्रॉसचे हे पहिले मोठे अपडेट असणार आहे.
नवीन फ्रंट डिझाइन आणि आकर्षक लूक
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टच्या टेस्टिंगदरम्यान गाडीच्या पुढील भागात अनेक बदल दिसून आले आहेत. नवीन मॉडेलमध्ये रुंद आणि अँग्युलर ग्रिल, स्लिम प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि रिडिझाइन केलेले बंपर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पिक्सेल-स्टाइल LED फॉग लॅम्प्स, नवीन अलॉय व्हील्स आणि मागच्या टेललॅम्प्सच्या ग्राफिक्समध्ये बदल होऊ शकतात. गाडीचा साइड प्रोफाइल, रूफलाइन आणि एकूण आकार सध्याच्या मॉडेलसारखाच राहण्याची शक्यता आहे.
इंजिन आणि हायब्रिड टेक्नोलॉजी कायम राहणार?
नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये सध्याचे 2.0-लिटर पेट्रोल इंजिन ऑप्शन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 173 hp पॉवर देते, तर पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रिड सिस्टम 184 hp ची संयुक्त पॉवर देते. पेट्रोल व्हर्जनमध्ये CVT आणि हायब्रिड मॉडेलमध्ये e-CVT गिअरबॉक्स मिळतो. सध्याच्या ARAI प्रमाणित मायलेजनुसार पेट्रोल मॉडेल 16.13 kmpl, तर हायब्रिड मॉडेल 23.24 kmpl मायलेज देते.
केबिनमध्ये मोठी स्क्रीन आणि नवीन फीचर्स
इंडोनेशियामध्ये लाँच झालेल्या किजांग इनोव्हा झेनिक्सच्या अपडेटवरून भारतीय मॉडेलच्या केबिनमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेलमध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळू शकते. सध्याच्या मॉडेलमध्ये पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स आणि दुसऱ्या रांगेतील ऑटोमन सीट्स मिळतात. फेसलिफ्टमध्ये नवीन इंटीरियर कलर, अपहोल्स्ट्री आणि अपडेटेड सॉफ्टवेअर मिळण्याची शक्यता आहे.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे नवीन मॉडेल लाँच! मोठी स्क्रीन, पॅनोरॅमिक कॅमेरा आणि हायटेक फीचर्स
E30 पेट्रोल सपोर्ट आणि संभाव्य किंमत
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी जास्त सपोर्ट मिळू शकतो. कंपनीने यापूर्वी E85 इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स-फ्युएल हायक्रॉस प्रोटोटाइप दाखवले होते. नवीन मॉडेल E30 किंवा जास्त इथेनॉल मिश्रणाला सपोर्ट करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत अजून ऑफीशली माहिती समोर आलेली नाही.
नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹20 लाख ते ₹35 लाख असू शकते. मारुती सुझुकी इन्व्हिक्टो ही तिची जवळची प्रतिस्पर्धी असेल. नवीन डिझाइन, हायब्रिड टेक्नोलॉजी आणि केबिनमधील बदलांमुळे ही MPV कस्टमर्ससाठी एक नवीन ऑप्शन ठरू शकते.
Ans: टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात 25 नोव्हेंबर 2026 रोजी लाँच होणार आहे.
Ans: नवीन मॉडेलमध्ये 2.0-लिटर पेट्रोल आणि पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रिड इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. हायब्रिड सिस्टम 184 hp संयुक्त पॉवर देते.
Ans: नवीन इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹20 लाख ते ₹35 लाख असू शकते.






