Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 Idiot School : चित्रपटातील रँचोची शाळा पाहा खऱ्या आयुष्यात, या ठिकाणाला द्यावी लागेल भेट

‘3 इडियट्स’मधील रँचोची शाळा तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात दिसलेली ही शाळा केवळ सेट नसून लेह-लडाखमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या या शाळेची स्वतःची खास ओळख आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 08:23 AM
Sonam Wangchuk,Ladakh,3 Idiots,Travel Guide,Leh,Rancho school,3 Idiots school,Aamir khan,Rancho School In Ladakh,3 idiots rancho school, ‘3 इडियट्स’मधील रँचोची शाळा, travel news marathi, ड्रुक व्हाइट लोटस स्कूल, ड्रुक पद्मा कारपो स्कूल, marathi news, marathi batamya, मराठी न्यूज, मराठी बातम्या, Google news, navarashtra

Sonam Wangchuk,Ladakh,3 Idiots,Travel Guide,Leh,Rancho school,3 Idiots school,Aamir khan,Rancho School In Ladakh,3 idiots rancho school, ‘3 इडियट्स’मधील रँचोची शाळा, travel news marathi, ड्रुक व्हाइट लोटस स्कूल, ड्रुक पद्मा कारपो स्कूल, marathi news, marathi batamya, मराठी न्यूज, मराठी बातम्या, Google news, navarashtra

Follow Us
Follow Us:
  • ‘3 इडियट्स’मधील रँचोची शाळा प्रत्यक्षात लेह-लडाखमध्ये आहे.
  • शाळेचे खरे नाव ‘ड्रुक व्हाइट लोटस स्कूल’ असून पर्यावरणपूरक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
  • लडाखला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण चित्रपटाच्या आठवणींसोबतच एक खास आकर्षण ठरते.
३ इडियट्स चित्रपट तर सर्वांनीच पाहिला असेल. हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता पण आजही चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. यातील आमिर खानचे पात्र रँचो सर्वांच्या आवडीचे ठरले. चित्रपटात आपल्याला रँचोची शाळा देखील दाखवण्यात आली आहे. आपल्याला वाटलं असेल की, ही शाळा फक्त चित्रपटाचा सेट म्हणून दाखवण्यात आली आहे पण असं नाहीये. खरंतर चित्रपटात दाखवण्यात आलेली रँचोची आगळी-वेगळी शाळा खऱ्या आयुष्यात लेह-लडाखमध्ये अस्तित्वात आहे. चित्रपटातील सीन्सचा खऱ्या आयुष्यात अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ही शाळा पाहायला लेह-लडाखची सैर करु शकता. चित्रपटामुळे या शाळेला प्रसिद्धी मिळाली असली तरी शाळेची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे.

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

रँचो शाळेची कथा

ज्या ठिकाणाला रँचो शाळेच्या नावाने ओळखले जाते, याचे खरे नाव ड्रुक व्हाइट लोटस स्कूल (Druk White Lotus School) असे आहे. याचे अधिकृत नाव ड्रुक पद्मा कारपो स्कूल असे आहे. ही शाळा लेहपासून साधारण १५ किमी दूर एका शांत गावात वसले आहे. ३ इडियट्स चित्रपटाच्या क्लायमेक्समध्ये या शाळेला दाखवण्यात आले होते ज्यानंतर देश-विदेशात शाळेला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या शाळेची स्थापना लडाखच्या मुलांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. यासोबतच मुलं आपली स्थानिक संस्कृती आणि तिबेटियन बाैद्ध परंपरेशी जोडलेले राहतील याचीही काळजी शाळेत घेतली जाते. या शाळेची खासियत म्हणजे इथे विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासावर फोकस ठेवायला सांगितले जात नाही तर २१ व्या शतकाच्या गरजांशी सुसंगत असे शिक्षण इथे दिले जाते.

काय आहे शाळेची खासियत?

ड्रुक व्हाइट लोटस शाळा अभ्यासासोबतच येथील वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. लडाखमध्ये हिवाळ्यात भरपूर थंडी पाहायला मिळते अशात शाळेच्या इमारतीला अशाप्रकारे तयार करण्यात आले आहे की आत उबदारपणा जाणवेल. शाळेत सोलार हिटींग, नैसर्गिक इन्सुलेशन आणि हवामानाला प्रतिसाद देणाऱ्या इमारती यांसारख्या वैशिष्ट्यांचा वापर केला जातो. हेच कारण आहे की याच्या पर्यावरणपूरक रचनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली आहे.

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

ही शाळा लेह-मनालीच्या हायवेवर आहे ज्यामुळे फिरायला आलेले पर्यटक सहजरित्या शाळेला भेट देऊ शकतात. पर्वतांच्या कुशीत वसलेली ही शाळा फक्त शिक्षणाचे घर नसून चित्रपटप्रेमींसाठी ते एक आठवणीचे ठिकाण बनले आहे. लडाखच्या शेय गावात वसलेली ही शाळा लेहपासून साधारण २० ते ३० मिनिटांवर वसली आहे. इथे जाण्यासाठी तुम्ही टॅक्सीचा पर्याय निवडू शकता. इथे फिरायला जाण्यासाठी सप्टेंबरच्या मधला काळ सर्वोत्तम मानला जातो. शाळा साधरणपणे सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुली केली जाते. इथे प्रवेशासाठी कोणतेही तिकिट किंवा पैसे आकारले जात नाही.

Web Title: 3 idiots rancho school druk white lotus school leh ladakh travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • 3 idiots
  • Ladakh
  • travel news

संबंधित बातम्या

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन
1

भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral
2

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या
3

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
4

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.