Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या

Shravan 2025 : श्रावणात शिवमंदिरांना विशेष महत्त्व प्राप्त होते. अशात आम्ही तुम्हाला देशातील अशा मंदिराची माहिती सांगत आहोत जिथे श्रावणात तुम्ही फ्रीमध्ये राहू आणि जेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2025 | 08:32 AM
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी एखाद्या सणासारखा असतो. या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा-अर्चा केली जाते, रुद्राभिषेक केला जातो आणि कावड यात्रा काढली जाते. देशभरातून लाखो श्रद्धाळू दरवर्षी सावनमध्ये प्रसिद्ध शिवमंदिरांच्या दर्शनासाठी जातात. काहीजण मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी जातात, तर काहीजण शांतीच्या शोधात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जातात. तुम्हीही अशा यात्रा करण्याचा विचार करत असाल, तर काही असे शिवमंदिर आहेत जिथे तुम्हाला मोफत राहण्याची व खाण्याची सोय मिळते. चला तर जाणून घेऊया अशा काही प्रमुख शिवमंदिरांविषयी…

महाराष्ट्रातील या गावात वसलंय जगातलं पहिलं भूमिज मंदिर; भगवान शिवाला समर्पित, पांडवांनी केली होती बांधणी
काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी

काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, मोक्ष आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून शिवाची अत्यंत प्रिय नगरी समजली जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती काशीमध्ये शेवटचा श्वास घेतो, त्याच्या कानात भगवान शिव स्वतः तारक मंत्र म्हणतात, ज्यामुळे त्या व्यक्तीस मोक्षप्राप्ती होते. येथे भक्तांसाठी मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक धर्मशाळांच्या माध्यमातून मोफत किंवा अत्यंत कमी दरात निवासाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय ‘काशी अन्नक्षेत्र’ या उपक्रमांतर्गत रोज हजारो भक्तांना मोफत सात्विक भोजन दिले जाते.

कसे जाल?

रेल्वे स्थानक: वाराणसी जंक्शन (सुमारे ५ किमी)
एअरपोर्ट: लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ (२५ किमी)
स्थानक किंवा विमानतळावरून तुम्ही सहजपणे टॅक्सी, ई-रिक्शा किंवा ऑटोने मंदिर परिसरात पोहोचू शकता.

श्री महाकालेश्वर मंदिर, उज्जैन

उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर हे उज्जैनचे प्रमुख आकर्षण असून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असून खूपच प्रभावशाली मानले जाते. येथे दररोज पहाटे भस्म आरती केली जाते, जी अत्यंत प्रसिद्ध आहे. सावन महिन्यात भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासन व इतर धार्मिक संस्था मोफत निवास व भोजन व्यवस्था करतात. येथे अनेक धर्मशाळा व ट्रस्ट स्वच्छ व सुसज्ज खोल्या देतात आणि सात्विक अन्न मोफत दिले जाते.

कसे जाल?

रेल्वे स्थानक: उज्जैन जंक्शन (४ किमी)
एअरपोर्ट: इंदौर – देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ (५५ किमी)
स्थानिक ऑटो, टॅक्सी व बस सेवा उपलब्ध आहे.

बाबा बैद्यनाथ धाम, देवघर

झारखंडच्या देवघर शहरात वसलेले बाबा बैद्यनाथ धाम, ज्याला ‘बाबा धाम’ असेही म्हणतात, हे एक प्रसिद्ध व पौराणिक शिवमंदिर आहे. हे देखील द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. मान्यता आहे की रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले होते आणि त्यांना हे शिवलिंग प्राप्त झाले होते. पण ते देवघरमध्ये स्थापित झाले आणि त्यामुळे हे स्थान अत्यंत प्रभावी व फलदायी मानले जाते. श्रावणी मेळावादरम्यान मंदिर ट्रस्ट व सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर लंगर व अन्नछत्रे चालवतात जिथे मोफत सात्विक अन्न दिले जाते.

Raksha Bandhan 2025 : वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होतं हे मंदिर; रक्षाबंधनाच्या दिवशी खच्चून भरते गर्दी

कसे जाल?

रेल्वे स्थानक: देवघर जंक्शन (५ किमी)
एअरपोर्ट: देवघर विमानतळ (८ किमी)
येथून मंदिरापर्यंत टॅक्सी, ऑटो व लोकल वाहनांनी सहज पोहोचता येते.

या श्रावण महिन्यात जर तुम्ही भक्तिभावाने शिवदर्शनासाठी प्रवास करत असाल, तर या मंदिरांना भेट देऊन आध्यात्मिक समाधानासोबत मोफत निवास आणि भोजनाचाही अनुभव घेऊ शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

आपण कोणत्या दिवशी शिव मंदिरात जायला हवे?
पहाटे किंवा संध्याकाळी

भगवान शिवाचा आवडता दिवस कोणता आहे?
सोमवार

Web Title: 3 shiva temples in india where you get free food and accommodation must visit in shravan travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
1

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
2

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
3

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…
4

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.