Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार जलजिरा, नोट करा रेसिपी

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर विकतचे कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेला जलजिरा प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 08:00 AM
उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार जलजिरा, नोट करा रेसिपी

उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार जलजिरा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे सतत अपचन, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अपचन झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर होत नाही. गोळी खाल्ल्यानंतर काही वेळापुरते बरे वाटते आणि पुन्हा एकदा अपचनाचा त्रास सुरु होतो. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्नाचे कण उलट्या दिशेने परत येतात. हे कण घशाजवळ अडकल्यामुळे घशात जळजळ, आंबट ढेकर तर काहीवेळा उलट्या आणि मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उन्हाळ्यात जलजिरा प्यावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये थंडगार जलजिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच जाईल विरघळून

साहित्य:

  • पुदिना
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • आलं
  • गूळ
  • बर्फाचे तुकडे
  • बुंदी
नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

कृती:

  • जलजिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, आले, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि आवडीनुसार गूळ घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट भांड्यात काढून घ्या. त्यानंतर त्यात २ ग्लास थंड पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार केलेले सरबत गाळून सुद्धा घेऊ शकता. पण त्यातील पुदिन्याची पाने शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतील आणि फायबर असलेले पदार्थ पोटात गेल्यानंतर पचनक्रिया निरोगी राहील.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे खडे घालून मसाला जलजिरा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेला जलजिरा ग्लासात ओतून त्यात पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे उन्हाळ्यात बनवलेला थंडगार जलजिरा.

Web Title: 5 minutes quick chilled jaljeera to get relief from acidity and indigestion in summer note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.