बेदाण्याचे आरोग्यदायी फायदे (फोटो सौजन्य - iStock)
तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यात ड्रायफ्रूट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक ड्रायफ्रूट्सची स्वतःची एक खासियत असते. निरोगी आरोग्य मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बेदाण्यांचादेखील समावेश करून घेऊ शकता. बेदाणा हे एक सुपरफूड आहे, जे द्राक्षे वाळवून बनवले जाते. त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते आणि त्याचे वेगवेगळे आरोग्य फायदे मिळू शकतात.
बेदाण्यामध्ये भरपूर पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीजदेखील असतात. जर तुम्ही दररोज मनुके खाल्ले तर ते पचन, हाडे आणि हृदयाचे आरोग्य वाढविण्यास मदत करेल. याशिवाय, त्याच्या सेवनाने वजनदेखील नियंत्रित करता येते. आता बेदाण्याचे फायदे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली आहे, तर या ड्रायफ्रूटचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घ्या.
बेदाण्यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब६, क, ड, ई आणि के, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस असे पोषक घटक असतात, जे तुम्हाला खालील फायदे देऊ शकतात (फोटो सौजन्य – iStock)
पचनक्रिया राहते उत्तम
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी
मेडिकल न्यूज टुडेनुसार, मनुका खाणे हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी सर्वात सोप्या मार्गांपैकी एक ठरू शकते. त्यात विरघळणारे फायबर असते, जे आतड्यांच्या हालचालीत मदत करते. तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही बेदाणे खाणे उत्तम ठरेल. दिवसातून ३ – ४ बेदाणे तुम्ही खावे अथवा रात्री बेदाणे पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी याचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहण्यास आणि सुरळीत होण्यास मदत मिळते.
सकाळी उपाशीपोटी खाल भिजवलेला बेदाणा, 15 दिवसात 5 आजारांना म्हणाल ‘बाय-बाय’
एनिमिया रोखण्यासाठी
एनिमियासारख्या आजारावर उत्तम
अशक्तपणा अर्थात एनिमिया रोखण्यासाठी बेदाणा उपयुक्त ठरू शकतो. त्यामध्ये लोह, तांबे आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात, जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असतात. बेदाण्यामुळे एनिमियासारखा आजार रोखणे शक्य होते त्यामुळे तुम्ही आपल्या रोजच्या नाश्त्यात याचा उपयोग करून घ्यावा.
हृदयाच्या आरोग्याचा धोका होतो कमी
हृदय चांगले राखण्यासाठी
बेदाणे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासदेखील मदत करतात. एका अभ्यासात असे म्हटले आहे की नियमितपणे बेदाणे खाल्ल्याने इतर स्नॅक्सच्या तुलनेत रक्तदाबासारखे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक कमी होण्यास मदत होते. कारण बेदाणे हे कमी सोडियम असलेले अन्न आहे आणि ते पोटॅशियमचा एक चांगला स्रोत देखील आहे, जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी बेदाणे नियमित खावेत.
बेदाणे आणि मनुका दोन्ही एकच आहेत का? 95% लोकांना माहीत नाही अंतर, आरोग्यासाठी काय ठरते फायदेशीर
बेदाण्याचे इतर फायदे
बेदाण्याचे आरोग्यादायी फायदे
कर्करोगासाठीः मनुका हे अँटिऑक्सिडंट संयुगांचा चांगला स्रोत आहे. आहारातील अँटिऑक्सिडंट्स आवश्यक आहेत कारण ते शरीराचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करू शकतात. ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि मुक्त रॅडिकल्स हे अनेक प्रकारचे कर्करोग, ट्यूमर विकास आणि वृद्धत्वासाठी जोखीम घटक आहेत
ब्लड शुगरः अनेक अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की दररोज बेदाणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी ते मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे
त्वचा चांगली होण्यासाठीः अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी तरुण ठेवण्यास आणि वृद्धत्वाच्या पेशींमुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकतात. बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेसाठी आवश्यक जीवनसत्व आहे
हाडांच्या मजबूतीसाठीः बेदाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनचा चांगला स्रोत आहे, जो हाडांच्या आरोग्यासाठी योगदान देतो. बेदाण्यांच्या नियमित सेवनाने ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.