घरच्या घरी २ मिनिटांमध्ये हे उपाय करून तपासा हार्ट ब्लॉकेजेस
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. सतत बदलणारे वातावरण, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा तणाव, बिघडलेलं मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जीवनशैलीत बदल झाल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी, वाढते वजन इत्यादी अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षी जगभरात सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराचा झटका येऊ होत आहे. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेत जीवन जगणे आवश्यक आहे. हृदयाची स्थिती तपासण्यासाठी महिन्यातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे.आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास हृदयविकाराच्या झटक्यापासून शरीराचे नुकसान होणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
हृद्यासंबंधित आजार होण्याचे पहिले लक्षणं म्हणजे शरीरात वाढलेले ब्लड प्रेशर. शरीरात रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. साधारणतः 120/80 हे ब्लड प्रेशर आरोग्यदायी मानले जाते. पण तुमचे वय, वजन, उंची लिंग आणि औषधांच्या आधाराने बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. पण शरीरात रक्तदाब वाढलेले दिसल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
हृदयाचे वाढलेले ठोके हे सुद्धा हृदयविकाराचे येण्याचे लक्षणे आहे. हृदयाचे ठोके वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. अन्यथा आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. हृदयाचे ठोके 60 ते 100 प्रति मिनिट असे असतात. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी दोन बोटे मनगटावर ठेवून एका मिनिटांमध्ये किती ठोके होतात, हे मोजावे. यामुळे हृदयाचे आरोग्य समजते.
हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवण्याआधी छातीमध्ये वेदना,जळजळ, अस्वस्थता इत्यादी लक्षणे दिसून येतात. चालल्यानंतर किंवा जास्त काम केल्यानंतर छातीमध्ये दुखू लागल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते औषध उपचार करावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध चाचण्या करून हार्ट ब्लॉकेज आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.