Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin Deficiency: शरीरात ‘या’ विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

दीर्घकाळ आनंदी आणि कायमच निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक विटामिनची कायमच आवश्यकता असते. पण जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरास आवश्यक असलेल्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर उद्भवू शकतात या गंभीर समस्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 08:11 AM
शरीरात 'या' विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीरात 'या' विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:

विटामिनची कमतरता कशामुळे उद्भवते?
हाडे ठिसूळ होण्याची कारणे?
रोगप्रतिकारशक्ती कशामुळे कमी होते?

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन कायमच केले जाते. कधी फळे तर कधी भाज्या खाऊन शरीराला आवश्यक पोषण दिले जाते. रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषण मिळते. पण बऱ्याचदा चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव आणि शारीरिक हालचालींची कमतरता निर्माण झाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. शरीरास आवश्यक असलेल्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यामुळे आरोग्य बिघडते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारशी लक्षणे दिसून येत नाही, पण कालांतराने शारीरिक समस्या वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. ही लक्षणे वेळीच न ओळखळल्यामुळे गंभीर आजारांची शरीराला लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

शरीराला सर्वच विटामिनची सम प्रमाणात आवश्यकता असते. पण काहीवेळा जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे विटामिनची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने समस्या आणखीनच वाढू लागतात. विटामिन बी१२, विटामिन डी किंवा फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे कायमच थकल्यासारखे वाटते आणि कोणतेही काम करताना अशक्तपणा आणि काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. हे आजार शरीर आतून पोखरून टाकतात आणि शरीरास धोका निर्माण करतात.

या विटामिनच्या कमतरतेमुळे शरीराला होऊ शकते आजारांची लागण:

बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणात केस गळणे, नखे ठिसूळ होणे इत्यादी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच वाढतात आणि शरीरास धोका निर्माण करतात. बायोटिन, व्हिटामिन डी, लोह आणि इतर जीवनसत्त्वे आवश्यक प्रमाणात शरीरास न मिळाल्यामुळे नखं सहज तुटणे किंवा मोठ्या प्रमाणावर केस गळून टक्कल पडण्याची जास्त भीती असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे.

त्वचा कोरडी पडणे, ओठ सतत फुटणे किंवा तोंडाच्या कोपऱ्यांना जखमा होणे ही लक्षणे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दिसून येतात. विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन सी आणि लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचा आणि ओठ कोरडे पडून जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. वारंवार सर्दी, खोकला किंवा संसर्ग होणे इत्यादी समस्या रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे उद्भवतात. विटामिन सी, विटामिन डी आणि झिंकची कमतरता निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते.

Money Plant: घरातील मनी प्लांट सुकतोय? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, होईल हिरवेगार

हाडे दुखणे, सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंमध्ये वेदना होणे आणि वारंवार पाठ दुखणे इत्यादी लक्षणे विटामिन डी च्या कमतरतेमुळे उद्भवतात. याशिवाय काहींना हातापायातून मुंग्या येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसू लागतात. त्यामुळे विटामिनच्या कमतरतेकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. मन सतत अस्वस्थ राहणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे किंवा मूडमध्ये वारंवार बदल होणे यांसारखी लक्षणे विटामिन बी१२ आणि विटामिन डी च्या कमतरतेमुळे उद्भवतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: A deficiency of this vitamin in the body leads to serious health problems be alert in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.