Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ प्रोटीनयुक्त लाडूचे सेवन

केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या पौष्टिक लाडूचे सेवन करावे. या लाडूच्या सेवनामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची झपाट्याने वाढ होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2025 | 09:45 AM
वारंवार केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' प्रोटीनयुक्त लाडूचे सेवन

वारंवार केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' प्रोटीनयुक्त लाडूचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, त्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, सतत खाज येणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक गोष्टींचा धोका वाढतो. याशिवाय आठवड्यातून दोनदा केस व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे शॅम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्ट वापरले जातात. पण केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस आणखीनच खराब होऊन जातात. केसांच्या मुळांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केस अतिशय निस्तेज होऊन जातात.(फोटो सौजन्य: Pinterest)

मॉईश्चरायझर लावून सुद्धा चेहरा सतत कोरडा पडत असेल तर ‘या’ सवयी वेळीच बदला, चुकीच्या सवयींमुळे होईल त्वचेचे नुकसान

केसांच्या वाढीसाठी केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. आहारात बदल करून केसांच्या वाढीस गुणकारी ठरणाऱ्या पदार्थांचे कायम सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी सकाळी उठल्यानंतर कोणत्या लाडूचे सेवन करावे? लाडूचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लाडूच्या सेवनामुळे केसांसोबतच शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारते.

केस गळती थांबवण्यासाठी लाडू कसे करावेत?

लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात तीळ, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्या. या बियांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या बियांमध्ये प्रोटीन, व्हिटामीन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यानंतर भाजून घेतलेल्या बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये मोरिंगा पावडर आणि आवळ्याची पावडर एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात तुम्ही खजूर सुद्धा मिक्स करू शकता. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात तूप टाकून मिक्स करा आणि लाडू बनवून घ्या. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लाडूचे सेवन केल्यास केस गळणे थांबेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.

Wrinkles Home Remedies: चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! ‘या’ हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य

लाडू खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी बाहेर जाण्याची सवय असते. पण असे न करता नियमित एक लाडूचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय लाडू खाल्यामुळे शरीराला बायोटीन, जिंक, ओमेगा थ्री, फॅटी एसिड्स आणि आयर्न मिळेल. ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतील. केसांमधील मॉईश्चर कायमच टिकून राहते. केसांच्या निरोगी वाढीसाठी तुम्ही नियमित एक किंवा दोन लाडूचे सेवन करू शकता. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Afraid of frequent hair loss then after waking up in the morning regularly consume this protein rich ladoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • hair care tips
  • healthy food
  • home remedies

संबंधित बातम्या

निर्जीव नसांना जिवंत करतो घरातील हा एक मसाला, Weak Nerves असणाऱ्या लोकांना आजपासूनच आहारात करा याचा समावेश
1

निर्जीव नसांना जिवंत करतो घरातील हा एक मसाला, Weak Nerves असणाऱ्या लोकांना आजपासूनच आहारात करा याचा समावेश

वारंवार गुडघे दुखतात? गुडघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम
2

वारंवार गुडघे दुखतात? गुडघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम

Wrinkles Home Remedies: चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! ‘या’ हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य
3

Wrinkles Home Remedies: चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील दूर! ‘या’ हिरव्या पानांचा फेसपॅक त्वचेवर आणेल तारुण्य

बद्धकोष्ठता आणि फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? हावर्ड डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा सेवन, आतड्या होतील स्वच्छ
4

बद्धकोष्ठता आणि फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? हावर्ड डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा सेवन, आतड्या होतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.