एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार गुलाबजल किंवा साधे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा. त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास आणि चेहरा ताजातवाना दिसण्यास मदत होऊ शकते.
दही आणि हळद एकत्र मिसळून तयार केलेला फेस पॅक कोरडी व निस्तेज त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. दह्यामधील नैसर्गिक घटक त्वचेला मऊपणा देण्यास मदत करतात, तर हळद त्वचेचा नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करू शकते.
कोरड्या त्वचेसाठी एक चमचा मधामध्ये चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास आणि तजेलदारपणा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
कोरफडीच्या जेलमध्ये थोडी हळद मिसळून तयार केलेला फेस पॅक संवेदनशील किंवा पिंपल्सची समस्या असलेल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा पॅक त्वचेला शांत ठेवण्यास मदत करतो.
हळदीचा वापर मर्यादित प्रमाणात करा, अन्यथा त्वचेवर पिवळसर रंग राहू शकतो. आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच फेस पॅक वापरा. त्वचेवर जखम, तीव्र अॅलर्जी किंवा जळजळ असल्यास घरगुती उपाय टाळा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






