वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आहारात करावा 'या' पदार्थांचा समावेश!
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. कारण महिला स्वतःच्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करतात. घर सांभाळणे, मुलांची जबाबदारी, कामाचा तणाव, नाते संबंध इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सचे संतुलन, मासिक पाळीच्या समस्या, असंतुलित आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे मानसिक तणाव वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. हल्ली तरुण वयातच अनेकांना हृदयरोग, कर्करोग किंवा मधुमेह इत्यादी गंभीर आजारांची शरीराला लागण होत आहे. त्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या तिशीनंतर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे. कारण या वयात शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांमुळे काहीवेळा मानसिक आणि शारीरिक आरोग्य पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे संतुलित आहारासोबतच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज माही तुम्हाला कायमच निरोगी राहण्यासाठी नियमित कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीराला भरपूर पोषण देतात.
दैनंदिन आहारात नियमित पुदिन्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आहारात होणाऱ्या बदलांमुळे किंवा बिघडलेल्या पचनक्रियेमुळे कायमच गॅस, अपचन आणि इतर समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याचे सेवन करावे.पुदिन्याचे पाणी किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्यास पोटात वाढलेली ऍसिडिटी कमी होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये असलेले मेंथॉल गुणधर्म शरीरात उष्णता कमी करतात.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात आवळा पावडर टाकून सेवन केल्यास पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. केस गळणे, पांढरे होणे किंवा त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळा अतिशय गुणकारी ठरतो. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय त्वचेमधील लवचिकता कायम टिकून राहते.
जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
महिलांच्या आरोग्यासाठी डाळिंब अतिशय गुणकारी ठरते. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक डाळिंब खाल्ल्यास शरीरातील रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर कायमच निरोगी राहील. शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होणार नाही. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळतो आणि फायब्रॉईड्सचा त्रास होत नाही.
गर्भवती महिलांसाठी विशेष टिप्स:
गरोदरपणात योग्य वजन राखण्यासाठी आणि आरोग्य समस्या टाळण्यासाठी सकस आहार आणि शारीरिक हालचालींबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
फळे, भाज्या, आणि सकस प्रथिने यांचा आहारात समावेश करा. कुटुंब आणि कामाच्या धावपळीत स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करू नका. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.