वयाच्या तिशीनंतर महिलांनी कोणते विटामिन्स खावे
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. विशेषत: वयाच्या 30 वर्षांनंतर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. 30 नंतर शरीरात अनेक बदल होतात, विशेषतः महिलांना या काळात अनेक हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. अनेकदा काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जेव्हा त्यांचे वय तिशी ओलांडते तेव्हा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. अशा परिस्थितीत महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या आहारात 5 विटामिन्सचा समावेश करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया ती 5 जीवनसत्त्वे कोणती आहेत ज्यांचा महिलांनी आहारात समावेश केला पाहिजे. डाएटिशियन वत्सल सेठ यांनी कोणती विटामिन्स खावी याबाबात माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
विटामिन ई (Vitamin E)
विटामिन ई युक्त पदार्थ खावेत
निरोगी राहण्यासाठी शरीरात विटामिन ई असणे अत्यंत आवश्यक आहे. हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आहे जे ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढा देते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि डीएनए दुरुस्तीला समर्थन देते. त्यामुळे नियमित आपल्या डॉक्टरांना विचारून तुम्ही विटामिन ई खावे
विटामिन डी (Vitamin D)
विटामिन डी पदार्थांचा करा समावेश
व्हिटॅमिन डी देखील एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, ज्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. कॅल्शियमच्या शोषणासाठी हे आवश्यक आहे, जे हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक कार्याची काळजी घेते. इतकंच नाही तर वयाच्या ३० वर्षांनंतर व्हिटॅमिन डी मल्टिपल स्क्लेरोसिस आणि काही मोठ्या कॅन्सरपासूनही संरक्षण करते.
विटामिन बी (Vitamin B)
विटामिन बी चे करा सेवन
विटामिन बी हे ऊर्जा आणि चयापचय सुधारते, मेंदूचे कार्य आणि हार्मोनल असंतुलन सुधारते. हे रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासूनदेखील आराम देते आणि विशिष्ट वयानंतर बौद्धिक क्षमतेवर परिणाम होण्यापासून प्रतिबंधित करते. त्यामुळे आपल्या शरीरयष्टीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामिन बी चा आपल्या आहारात समावेश करून घ्यावा
विटामिन सी (Vitamin C)
विटामिन सी ठरेल पोषक
विटामिन सी हे एक असे अँटी-ऑक्सिडंट आहे जे कोलेजनचे उत्पादन वाढवते, त्वचेचे आरोग्य सुधारते, चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करते, अकाली वृद्धत्व रोखते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. विटामिन सी हे लोह शोषण्यास मदत करते आणि अगदी जुन्या आजारांपासूनदेखील संरक्षण करते.
विटामिन के (Vitamin K)
विटामिन के युक्त पदार्थ
रक्त गोठणे, हाडांचे आरोग्य आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. हे रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरला प्रतिबंध करते. म्हणून, वयाच्या 30 नंतर, जेव्हा हाडांमध्ये कॅल्शियम कमी होऊ लागते, तेव्हा पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन के घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.