५ पांढरे पदार्थ जे खाणे टाळा (फोटो सौजन्य - iStock)
प्रश्न असा आहे की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय वापरले जाऊ शकतात? मेदांताचे डॉक्टर राजीव पारख म्हणाले की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ताटातून 5 पांढऱ्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील. हे पदार्थ नक्की कोणते आहेत ते जाणून घ्या
सफेद तांदळाचा भात

तांदळाच्या भाताचे सेवन रात्री करणे टाळा
डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी पांढरा भात पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. पांढऱ्या भातामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीरात ग्लुकोजमध्ये लवकर रूपांतरित होतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो, विशेषतः जर तुम्ही ते रात्रीच्या जेवणात खाल्ले तर त्याचा अधिक परिणाम होतो आणि लठ्ठपणा वाढीला लागतो.
थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!
साखर खाणे टाळा

साखर ठरते त्रासदायक
साखर आणि गोड पदार्थ टाळणेदेखील अत्यंत महत्वाचे आहे. केक, पेस्ट्री, मिठाई आणि साखरयुक्त पेये यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होते. यामुळे केवळ वजन वाढतेच नाही तर मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकादेखील वाढतो. आपल्या आहारातून साखरेचे पदार्थ खाणे अथवा अगदी नुसती साखर खाणेदेखील टाळा
मीठ

मिठामुळेही वाढते वजन
आपल्या आहारामध्ये तुम्ही मीठ जपून वापरा. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे सूज येते आणि वजन वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोकादेखील वाढतो. स्वयंपाक करताना मीठ सेवनाबद्दल काळजी घ्या आणि मीठाचे सेवन मर्यादित करा. अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता
मैदा वा मैद्याचे पदार्थ

मैद्याच्या पदार्थांनी जमा होते चरबी
रिफाइंड मैदा किंवा पांढऱ्या मैद्यापासून बनवलेले तळलेले पदार्थ टाळा. बेकरी पदार्थ, समोसे, डंपलिंग्ज आणि तळलेले स्नॅक्स वजन वाढण्यासाठी सर्वात धोकादायक असतात. या पदार्थांमुळे पोटावर लवकर चरबी जमा होते आणि शरीरात चरबी म्हणून बराच काळ टिकते. ती कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे मैदा खाणे टाळा.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
दूध आणि डेअरी उत्पादने

डेअरी उत्पादने टाळा
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. दुधात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात, परंतु त्यात जास्त चरबी आणि साखर देखील असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. दही सुरक्षित आहे कारण ते पचनासाठी चांगले आहे, परंतु चीज, तूप आणि बटरचे सेवन मर्यादित ठेवा.
रात्री लवकर जेवा
डॉक्टरांनी रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी करावे असा सल्ला दिला आहे. जर तुम्ही जेवून झोपायला गेलात तर त्या अन्नाचा तुमच्या शरीराला वजन वाढवण्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे वजन वाढत असेल आणि कमी करायचे असेल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळणं तुमच्यासाठी योग्य ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






