शरीरात Vitamin B12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
शरीर कायमच निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव सक्रिय असणे अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते. शरीराला विटामिन बी १२ ची खूप जास्त आवश्यकता असते. विटामिन बी १२ शरीरातील लाल रक्त पेशी वाढवते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. पण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप आणि तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा, चुकूनही करू नका नियमित सेवन
विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. थकवा, अशक्तपणा येणे, भूक कमी होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचा करावेत. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर मानसिक आजार, पचनक्रिया वारंवार बिघडणे, शारीरिक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? विटामिन बी १२ वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे वारंवार बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पचनाच्या इतरही समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत घरगुती उपाय करणे सुद्धा आवश्यक आहे. आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्या आतड्यांमधील हालचाल सुलभ राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतील.
बऱ्याचदा कितीही आवडीचा पदार्थ बनवल्यानंतर तो खाण्याची जास्त इच्छा होत नाही. विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीराची भूक पूर्णपणे मंदावते. कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शरीराला आहारातून योग्य पोषण मिळत नाही. तसेच विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे पायांमध्ये जळजळ, वेदना, सूज इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे पोटात जडपणा वाढू लागतो. याशिवाय उलट्या, मळमळ, वारंवार होणारी ऍसिडिटी इत्यादी लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
CML उपचारांच्या उद्दिष्टांमध्ये बदल, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे पालटले स्वरूप; कसे जाणून घ्या
विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात दूध, पनीर,दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यास मदत होते. याशिवाय आंबट फळांचे सेवन केल्यासमुळे शरीराला विटामिन सी मिळते. सफरचंद, संत्री, केळी, किवी, पालेभाज्या, पालक पनीर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन करावे.
विटामिन बी१२ म्हणजे काय?
विटामिन बी१२ हे शरीरातील प्रत्येक पेशीसाठी आवश्यक आहे आणि ते मज्जासंस्था आणि लाल रक्तपेशींच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
विटामिन बी१२ ची कमतरता का होते?
आहारात या जीवनसत्त्वाचा समावेश नसणे, विशेषतः शाकाहारी आहारात, हे एक प्रमुख कारण आहे.शरीरामध्ये विटामिन शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यास देखील कमतरता येऊ शकते.
विटामिन बी१२ च्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?
अशक्तपणा किंवा खूप थकल्यासारखे वाटणे, मळमळ, उलट्या किंवा अतिसार होणे, भूक न लागणे, न्यूरोलॉजिकल लक्षणे.