अनंत अंबानीनी विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिली खास भेटवस्तू
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाह सोहळा १२ जुलै ला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक पाहुणे उपस्थित होते. मागील वर्षांपासून अनंत राधिकाच्या लग्नापुर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली होती. लग्नाआधी त्यांचे दोन प्री वेडिंग सोहळे पार पडले. या शाही विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना देखील करोडो रुपयांचे गिफ्ट देण्यात आले आहे. अनंत अंबानी यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना २ कोटी रुपयांचे आलिशान घड्याळ भेटवस्तू म्हणून दिले आहे.
विवाह सोहळ्यासाठी जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती, नेते मंडळी, सेलिब्रिटी यांच्यासह इतर पाहुणे उपस्थित होते. शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यात आलेल्या २५ खास पाहुण्यांना अनंत अंबानी यांनी २ कोटी रुपयांचे आलिशान घड्याळ भेटवस्तू म्हणून दिले आहे. त्यामध्ये शाहरुख खान , रणवीर सिंग , शिखर पहारिया, वीर पहारिया, आणि मीझान जाफरी यांच्यासह इतर पाहुण्यांचा समावेश आहे.
अनंत अंबानी यांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिलेल्या घड्याळाची किंमत २ कोटी रुपये एवढी आहे. 18 k रोझ गोल्ड मार्वल असलेले हे घड्याळ रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर ल्युमिनरी कंपनीचे असून त्यावर काळ्या रंगाचा डायल आहे. या घड्याळाला एक वेगळ्या प्रकारचा गुलाब सोन्याचा रंग आहे. त्यांनी दिलेल्या भेट्वस्तूची एकत्रित किंमत 50 कोटी रुपयांच्या वर आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासह इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते. मुंबईमध्ये 14 जुलै ला अनंत राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.