भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश आणि नीता अंबानींच्या धाकट्या मुलाचं लग्न काल फार थाटामाटात पार पडलं. सध्या सर्वत्र या लग्नाचीच चर्चा होत आहे. काल 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न पार पडले. या लग्नात देशभरातील सेलेब्रिटी आणि दिग्ग्ज लोकांनी आपली हजेरी दर्शवली. लग्नात अनेक प्रकारचे व्यंजन बनवले होते मात्र यातील चाट हा पदार्थ आता प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. नीता अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नात एका प्रसिद्ध दुकानातून खास चाटची ऑर्डर दिल्याचे सांगितले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाच्या मेन्यूमध्ये एका खास चाट भंडारच्या फ्लॅगशिप चाटचा समावेश केल्याचे सांगण्यात आले आहे. यांनतर या चाटला लग्नासाठी खास करून बोलावण्यात आले.
12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा भव्य विवाहसोहळा पार पडला. वाराणसीच्या प्रसिद्ध काशी चाट भंडारच्या मालकांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास सांगितले गेले होते. लग्नात त्यांना त्यांचे काही प्रसिद्ध पदार्थ सर्व्ह करण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. काशी चाट भंडारमध्ये टिक्की, टोमॅटो चाट, पालक चाट, चना कचोरी आणि कुल्फी मिळण्याची शक्यता आहे.
काशी चाट भंडार म्हणून ओळखले जाणारे हे दुकान सुमारे 60 वर्षे जुने आहे. या दुकानात 10 प्रकारच्या चाट बनविल्या जातात. यापैकी सर्व पदार्थांची चव जवळपास 50 रुपये इतकी आहे. काशी चाट भंडारचे मालक यश केशरी यांनी सांगितले होते की, येथून अंबानींच्या लग्न सोहळ्यापर्यंत अनेक प्रकारच्या पदार्थ पानात वाढले जातील. वाराणसीतील प्रसिद्ध चाटमध्ये यांच्या दुकानाचा विशेष करून समावेश होतो.