
आठवड्यातून दोन वेळा 'या' पद्धतीने केसांवर लावा कांद्याचा रस, केस गळती थांबून केसांना मिळेल आवश्यक पोषण
सर्वच महिलांना आपले केस कायमच घनदाट, काळेभोर आणि मजबूत हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो तर कधी केसांच्या विविध ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण काहीवेळा वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केस घनदाट आणि मजबूत होण्याऐवजी आणखीनच निस्तेज होतात, ज्याच्या परिणामामुळे केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा तर काहीवेळा टाळूवर वाढलेल्या इन्फेक्शनमुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
केस गळणे ही समस्या अतिशय सामान्य आहे. पण केसांमध्ये टक्कल पडेल एवढे केस गळणे अजिबात चांगले नाही. यामुळे केसांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावे. आज आम्ही तुम्हाला कांद्याचा रस लावल्यामुळे केसांना नेमके कोणते फायदे होतात? केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या रसाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
केसांची योग्य निगा न राखल्यास केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. याशिवाय बदलेली लाईफस्टाईल, ताणतणाव, अपुरी झोप, आहारातील पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. कांद्याच्या रसात असलेले गुणकारी घटक केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे बारीक वाटून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर तयार केलेले मिश्रण ओतून कांद्याचा रस काढून घ्यावा. त्यानंतर कांद्याच्या रसात खोबरेल तेल, मध, कोरफड जेल मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण फ्रिजमध्ये ठेवू नये. अन्यथा त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होऊ शकतात.
मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
तयार केलेला कांद्याचा रस केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. केसांच्या लांबीवर लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही. केसांच्या मुळांमध्ये कांद्याचा रस लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे केसांच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यानंतर ३० मिनिटं कांद्याचा रस केसांमध्ये ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे दोन ते तीन आठवड्यांमध्ये केसांच्या वाढत्या समस्या कमी होतील आणि केस चमकदार सुंदर होण्यास मदत होईल. कांद्याच्या रसात सल्फर असलेले केसांच्या गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
Ans: कांद्यामध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसांच्या आरोग्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते; मात्र केसगळती थांबवण्याचा खात्रीशीर उपाय म्हणून त्याकडे पाहू नये.
Ans: कांद्याचा रस गाळून टाळूच्या मुळांवर हलक्या हाताने लावता येतो. साधारण २०–३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.
Ans: आठवड्यातून १–२ वेळा वापरून पाहता येतो. टाळूवर खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवावा.