Apurva Nemlekar Ganeshotsav Look: निळ्या साडीत अपूर्वा नेमळेकरचा सुंदर मराठमोळा लुक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणेशोत्सव आला की सगळीकडे एक वेगळेच वातावरण निर्माण होते. सामान्य लोकांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत बाप्पाला घरी आणण्याची तयारी सुरु झाली. याचा रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री नेमळेकरने आपल्या घरात बाप्पाची स्थापना केली आहे. बाप्पासोबतचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि तिचे ते फोटो पाहून चाहत्यांनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. कारण या फोटोंमध्ये अपूर्वा एकदम साधी, सुंदर आणि पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी अपूर्वाने निळ्या रंगाची एकदम साधी पण देखणी साडी नेसली होती. या साडीमध्ये तिचे सौदर्य अगदी खुलून केले. कोणत्याही प्रकार ओव्हर मेकअप तिने केला नसून अगदी सध्या लूक अपुर्वाने घेतला आहे. सणाच्या दिवशी कसं पारंपारिक दिसावं यासाठी ती योग्य उदाहरण असेल. सध्या सोशल मीडियावर सगळे तिच्या या निळ्या साडीचीच चर्चा करत आहेत. Apurva Nemlekar Ganeshotsav Look:
अपूर्वाच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली आणि गोड हसू आले आहे. आजकाल मुली सणाला पण खूप जड मेकअप करतात, पण अपूर्वाने नैसर्गिक सौंदर्याला जास्त महत्व दिलं. तिच्या चेहऱ्यावर बाप्पा आल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. भक्तीभाव आणि सणाचा उत्साह दोन्ही तिच्या फोटोत दिसत होता.
View this post on Instagram
अपुर्वाच्या या संपूर्ण लूकमध्ये सगळ्यात जास्त मंगळसूत्रानेलक्ष वेधून घेतलं निळ्या साडीवर तिने घातलेलं पारंपारिक मराठमोळं मंगळसूत्र एकदम उठून दिसत होतं. अनेक महिलांनी कमेंट करून विचारलंय की हे मंगळसूत्र कुठून घेतलं. तिच्या साडी आणि दागिन्यांची मॅचिंग एकदम परफेक्ट होती. जास्त दागिने नाहीत, गरजेचे तेवढेच. त्यामुळे लूक अगदी सुंदर आणि सोबर वाटत होता.
DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
अपूर्वाने फक्त स्वतःचे फोटो नाही तर बाप्पासोबतचे पण काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. घरातल्या गणरायासमोर उभं राहून तिने फोटो काढले आहेत. बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असलेली अपूर्वा पाहून तिची भक्ती दिसून येते.
दरवर्षी ती गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा करते. कुटुंबासोबत वेळ घालवणं, बाप्पाची पूजा करणं याला ती खूप महत्व देते. तिच्या फोटोंमधून घरच्या गणपतीचा साधा आणि सुंदर उत्सव पाहायला मिळतो.
Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
अपूर्वा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यातले अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिचा हा गणेशोत्सवाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या जास्तच पसंतीस उतरला आहे. अनेकजणींनी तर म्हटलंय की गणपतीसाठी साडी नेसायची आयडिया तिच्याकडून घेऊ. एकूणच काय तर निळ्या साडीतल्या अपूर्वाने या गणेशोत्सवात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.






