Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतिहासप्रेमी आहात? मग महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंना एकदा तरी भेट द्यायलाच हवी

Historical Places : महाराष्ट्रात अजंठा, वेरूळ, एलीफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांसारखी युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. 

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 08:45 AM
इतिहासप्रेमी आहात? मग महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंना एकदा तरी भेट द्यायलाच हवी

इतिहासप्रेमी आहात? मग महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंना एकदा तरी भेट द्यायलाच हवी

Follow Us
Follow Us:
  • इतिहासप्रेमींसाठी आज आम्ही काही खास ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत.
  • महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांना तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी.
  • चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर आधुनिक शहरे, उंच इमारती आणि सुंदर समुद्रकिनारे उभे राहतात. मात्र हा राज्य आपल्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना त्यांच्या अनोख्या इतिहास, अप्रतिम कला आणि नैसर्गिक महत्त्वामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तसेच प्राचीन वास्तुकला आणि कलेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही ठिकाणे खूप खास आहेत.

चारधाम यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं कराव? जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे भारताची प्राचीन कला, वास्तुकला आणि सांस्कृतिक विविधता जगासमोर मांडतात. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक येथे मोठ्या उत्साहाने भेट देतात. चला तर मग, महाराष्ट्रातील अशा पाच जागतिक वारसा स्थळांबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये इतिहास आणि कलेचा अनमोल ठेवा दडलेला आहे.

अजंठा लेणी

महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळ वाघूर नदीच्या खोऱ्यात वसलेली अजंठा लेणी बौद्ध कलेचा अप्रतिम नमुना मानली जातात. या लेण्यांची निर्मिती अंदाजे इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकापर्यंत झाली असल्याचे मानले जाते. येथे आढळणारी भित्तीचित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. या चित्रांमध्ये भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांशी संबंधित जातक कथा सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आल्या आहेत.

वेरूळ लेणी (एलोरा)

अजंठापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेली वेरूळ लेणी देखील जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. येथे एकूण 34 लेणी आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित वास्तू व शिल्पकला दिसून येते. या लेण्यांची निर्मिती मुख्यतः सहाव्या ते दहाव्या शतकादरम्यान झाली असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे येथील कैलास मंदिर संपूर्ण खडकातून कोरलेले असून ते भारतीय शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे.

एलीफंटा लेणी

मुंबईजवळील अरबी समुद्रातील एलीफंटा बेटावर असलेल्या एलीफंटा लेणीही खूप प्रसिद्ध आहेत. पाचव्या ते आठव्या शतकादरम्यान बांधलेल्या या लेण्यांमध्ये प्रामुख्याने भगवान शिवाची उपासना दर्शविणारी शिल्पे आहेत. येथील त्रिमूर्ती महेश ही भव्य मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या मूर्तीमध्ये शिवाचे तीन रूप सृजनकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता दर्शविले गेले आहेत.

जगातील सर्वात Cheapest Country, इथे भारतातील गरीब व्यक्तीही बनेल करोडपती; देशापासून किती लांब आहे ते जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ रेल्वे स्थानक नसून ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे वास्तुशिल्प आहे. याला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस असे म्हटले जात होते. 19व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश वास्तुकार फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी या इमारतीची रचना केली. 2004 मध्ये याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. विक्टोरियन गॉथिक शैली आणि भारतीय वास्तुकलेचा सुंदर संगम या इमारतीत पाहायला मिळतो.

पश्चिम घाट

महाराष्ट्रातील पश्चिम घाट ही विस्तीर्ण पर्वतरांग अनेक राज्यांमध्ये पसरलेली आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने ही जागा जगातील अत्यंत महत्त्वाच्या नैसर्गिक प्रदेशांपैकी एक मानली जाते. येथे अनेक दुर्मिळ आणि स्थानिक वनस्पती व प्राणी आढळतात. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी पश्चिम घाट हे एक स्वर्गच आहे. महाराष्ट्रातील ही सर्व वारसा स्थळे आपल्या समृद्ध इतिहासाची आणि अप्रतिम कलेची साक्ष देतात. त्यामुळे इतिहास, वास्तुकला आणि निसर्ग यांची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणांना आयुष्यात किमान एकदा तरी नक्की भेट द्यावी.

Web Title: Are you a history lover then you must visit these historical monuments in maharashtra travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • History
  • maharashtra
  • places to visit

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.