Diwali 2024 : तुम्हालाही उटण्याची अॅलर्जी आहे? मग दिवाळीत 'असा' बनवा होममेड फेसपॅक
दिवाळी म्हटलं की फराळ, रांगोळ्या, कंदील आठवतं त्याचप्रमाणे आठवतं ते अभ्यंगस्नान. दिवाळीतल्या पहिल्या अंघोळीच्या लहानपणीच्या आठवणींचा प्रत्येकाचा एक हळवा कोपरा आहे. सुंदधी तेल आणि त्यानंतर आईने लावलेलं उटणं या आठवणी आठवल्या की दिवाळीचा आनंद अजूनचं दुप्पट होतो.
सध्या बाजारात खास दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण मिळतात. तसंच उटणं देखील अगदी सहज मिळतं. दिवाळी आणि उटणं हे समीकरण अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. असं म्हणतात की, उटणं अंगाला लावल्याशिवाय दिवाळीची पहिली अंघोळ अपूर्ण आहे.
हेही वाचा- Diwali 2024: दिवाळीसाठी मराठमोळा लुक हवाय, मग ‘हे ‘ पारंपरिक दागिने नक्की परिधान करा…
असं जरी असलं तरी अनेकांना उटण्याची अॅलर्जी होते. खरंतर उटणं हे आयुर्वेदीक आणि पुर्वापार चालत आलेले फेसपॅक आहे. मात्र बऱ्याच जणांच्या त्वचेला त्याचा त्रास होतो. काही जणांची स्कीन अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे उटणं लावल्यावर त्वचेला खाज येणं, त्वचा लाल पडणं अशा समस्या निर्माण होतात.
उटण्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या खोडापासून तयार केलेलं असलं तरी काहींना याच्या नुसत्या वासाने शिंका येतात आणि डोळे लाल होतात. म्हणूनच बरेच जण दिवाळीत उटण न लावणंच पसंत करतात. जर तुम्हालाही अशीच उटण्याची अॅलर्जी होत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
हेही वाचा- प्रेम आणि शुभतेचे प्रतीक, काय आहे दिवाळीतील रांगोळीचे महत्त्व
दिवाळीत उटणं लावण्याची इच्छा असूनही अनेकांना अॅलर्जी होत असल्यामुळे उटणं लावता येत नाही. अशा वेळी तुम्ही उटण्याला पर्याय म्हणून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने फेसपॅक तयार करु शकता.
त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळाल्यामुळे त्वचेचं आरोग्य देखील चांगलं सुधारतं. त्यामुऴे दिवाळीत पहिल्या अंघोळीसाठी तुम्ही उटण्याऐवजी या होममेड फेसपॅकचा पर्यायचा निवडू शकता. या फेसपॅकमुळे कादी दिवसातच चेहऱ्यावर याचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून येईल.






