Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

अपचन, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तोंडात अल्सर येतात. तोंडात आलेले अल्सर दोन आठवड्याच्या आतमध्ये बरे न झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2026 | 08:11 AM
खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात 'या' सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात 'या' सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

Follow Us
Follow Us:

तोंडात फोड येण्याची कारणे?
तोंडात अल्सर येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी उपाय?

धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचाल, पोषक घटकांची कमतरता आणि बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पोटात वाढलेली जळजळ, बिघडलेली पचनक्रिया आणि तोंडात लालसर फोड इत्यादी लक्षणे उष्णता वाढल्यानंतर दिसून येतात. तोंडात आलेले वेदनादायी फोड खाण्यापिण्याचे वांदे करून टाकतात. याला माऊथ अल्सर सुद्धा म्हंटले जाते. हे केवळ तोंडातच नाहीतर आतड्यांमध्ये सुद्धा येण्याची जास्त शक्यता असते. तोंडात झालेल्या जखमांकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

क्षयरोग केवळ फुफ्फुसांमध्येच नाहीतर डोळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो! डोळ्यात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तोंडात आलेल्या अल्सरमुळे खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. वेदनादायी अल्सर अगदी पाणी पिताना सुद्धा खूप जास्त झोंबतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते आणि आतड्यांमध्ये विषारी घटक साचून राहतात. हेच विषारी घटक दीर्घकाळ शरीरात जमा होऊन राहिल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवण्यासोबतच तोंडात अल्सरचे फोड येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंडात अल्सर कशामुळे येतात? अल्सर किंवा लालसर फोड येऊ नये म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

तोंडात अल्सर येण्याची कारणे:

  • चुकून गाल किंवा जीभ चावली जाणे
  • शरीरात विटामिन बी-१२, झिंक, फॉलिक ॲसिड आणि लोहाची कमतरता
  • ताणतणाव, चिंता किंवा पुरेशी झोप न होणे
  • अति तिखट, मसालेदार किंवा लिंबू, संत्री, अननस इत्यादी फळांचे सेवन
  • मासिक पाळी किंवा गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल
  • क्रॉन्स डिसीज किंवा ल्युकोप्लाकिया

अल्सर किंवा लालसर फोड येऊ नये म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत:

तोंडात वारंवार उष्णतेमुळे फोड येत असतील तर सगळ्यात आधी शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. ताक, दही, दूध आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा आहारात समावेश करावा. पण कायमच तोंडात लालसर वेदनादायी फोड येत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. रात्रभर जागरण करून सकाळच्या वेळी झोपल्यामुळे रात्रीची आवश्यक झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे फार आवश्यक आहे. झोपेच्या सवयींमध्ये केलेला बदल शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतो.

Kidney Disease: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

अपचनाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या महिला पुरुषांमध्ये तोंडात फोड येणे किंवा अल्सर इत्यादी समस्या प्रामुख्याने दिसू लागतात. त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांसोबतच फळे आणि दुधाचा समावेश करावा. जेवणात फार तिखट किंवा तेलकट अन्नपदार्थ खाऊ नये. विटामिन बी १२, फोलेट, लोह कमी झाल्यानंतर तोंडात मोठ्या प्रमाणावर अल्सर येतात. हे अल्सर बरे करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. माऊथ अल्सरमुळे खूप जास्त त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तोंडात लालसर फोड का येतात?

    Ans: तोंडातील फोड अनेक कारणांमुळे येऊ शकतात. पोषणाची कमतरता, तणाव, तिखट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप किंवा तोंडाला झालेली इजा ही काही सामान्य कारणे आहेत.

  • Que: कोणत्या जीवनशैलीच्या सवयींमुळे तोंडातील फोड वाढू शकतात?

    Ans: अनियमित आहार, कमी पाणी पिणे, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, जास्त तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे फोडांची समस्या वाढू शकते.

  • Que: तोंडातील फोड किती दिवसांत बरे होतात?

    Ans: बहुतेक सामान्य फोड 7 ते 14 दिवसांत बरे होतात. मात्र वारंवार किंवा दीर्घकाळ राहणाऱ्या फोडांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Are you hungry change these habits and lifestyle that cause red sores in the mouth mouth ulcer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी
1

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
3

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.