Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, वेळीच करा उपचार

वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2025 | 01:46 PM
रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात 'या' गंभीर आजाराची लक्षणे

रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात 'या' गंभीर आजाराची लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

रात्री झोपल्यानंतर अनेकांना वारंवार तहान लागते. काहींना अर्ध्या अर्ध्या तासांनी पाणी पिण्याची सवय असते तर काही रात्रभर अजिबात पाणी पित नाहीत. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर वारंवार तहान लागणे, लघवीला होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. त्यामुळे योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, उच्च रक्तदाब आणि वाढलेला लठ्ठपणा आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतो. मधुमेह झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

हृदयाच्या नसा होतील क्षणार्धात स्वच्छ! खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश, मधुमेह राहील नियंत्रणात

थकवा, अशक्तपणा जाणवणे:

रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. ज्यामुळे मधुमेह होतो. रक्तात वाढलेल्या साखरेकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी सतत जागरण केल्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. यामुळे शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. वारंवार शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

रात्री अचानक घाम:

मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे शरीरातील इतर अवयवांना गंभीर इजा पोहचते. शरीरातील नाजूक अवयव सडून जातात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर रात्रीच्या वेळी अचानक घाम येणे किंवा हृदयाचे ठोके वाढून शरीराला हानी पोहचते.मधुमेह झाल्यानंतर सतत तोंड कोरडे पडून जाते.

वारंवार तहान लागणे आणि लघवीला होणे:

मधुमेह झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे वारंवार तहान लागणे आणि लघवीला होणे. शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढल्यामुळे वारंवार तहान लागणे, घसा कोरडा पडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.अजिबात दुर्लक्ष करू नये.

चुकूनही पिऊ नका ‘या’ फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान, आतड्यांना पोहचेल हानी

FAQs (संबंधित प्रश्न)

मधुमेहाच्या गुंतागुंती टाळण्यासाठी उपाय:

मधुमेहाची काळजी घेणे हे आयुष्यभर चालणारे काम आहे.तुमच्या उपचारांच्या योजनेचे काटेकोरपणे पालन करा.गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्या.

मधुमेहाचे प्रकार कोणते?

शरीर स्वतःच्या इन्सुलिन-उत्पादक पेशींवर हल्ला करते, ज्यामुळे इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. यावर उपचारांसाठी इन्सुलिन घेणे आवश्यक असते हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात, शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही किंवा पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are you often thirsty at night symptoms of this serious illness appear related to the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात करा चविष्ट Rajma Rice चा समावेश, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
1

दैनंदिन आहारात करा चविष्ट Rajma Rice चा समावेश, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात
2

Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात

‘ही’ हिरव्या रंगाची चटणी नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून काढेल बाहेर, कशी बनवाल
3

‘ही’ हिरव्या रंगाची चटणी नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून काढेल बाहेर, कशी बनवाल

२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, चुकूनही घेऊ नका हलक्यात
4

२२ वर्षीय मुलीचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, चुकूनही घेऊ नका हलक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.