Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका

शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. तसेच रक्तवाहिन्यांवर वाढलेला जास्तीचा तणाव कमी करण्यासाठी आहारात मिठाचे कमी सेवन करण्यासोबतच जीवनशैलीत बदल करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 08:07 AM
हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका

हृदयाचे ठोके अचानक वाढतात? जीवनशैलीतील 'या' बदलांमुळे उच्च रक्तदाब राहील नियंत्रणात, शरीरसंबंधित त्रासापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
जीवनशैलीत कोणते बदल करावेत?
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. हल्ली तरुण वयातील मुलामुलींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या प्रामुख्याने दिसून येते. रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आजार आहे. या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात अजिबात दिसून येत नाही. पण कालांतराने हृद्यासंबंधित आजार, किडनीचे आजार होऊन संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात की तोटे? कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होते का? जाणून घ्या सविस्तर

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर मेंदू आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव येतो, ज्याच्या परिणामामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंडाचे आजार किंवा शरीरसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. जीवनशैलीतील हे बदल कायमच निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • डोक्याच्या मागच्या भागात असह्य वेदना
  • छातीत जडपणा, तीव्र वेदना किंवा धडधड वाढणे
  • अचानक धाप लागणे किंवा सामान्य श्वासोच्छवासात अडथळे
  • अचानक तोल जाणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे
  • नाकातून रक्त येणे, कानात आवाज
  • उलट्या, मळमळ
  • अशक्तपणा थकवा आल्यासारखे वाटणे

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे:

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचार घेणे सहज सोपे होते. याशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, डाळी आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा. संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची कायमच समस्या उद्भवते अशांनी मिठाचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. सोडियमची पातळी वाढल्यानंतर किडनीसंबंधित आजार होण्याची शक्यता असते.

Health Tips: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या यामागचे सत्य

पोटॅशियमयुक्त अन्नपदार्थ शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवतात. त्यामुळे आहारात केळी, संत्री, पालक, टोमॅटो आणि काकडी यांसारख्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच आहारातून जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे. अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि लाल मांस खाल्ल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. नियमित प्राणायाम, व्यायाम, चालणे, धावणे, योगासने इत्यादी शारीरिक हालचाली करणे फार आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उच्च रक्तदाब म्हणजे काय?

    Ans: उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब सामान्यपेक्षा जास्त असतो.

  • Que: हृदयाचे ठोके अचानक वाढणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते का?

    Ans: काही प्रकरणांमध्ये हृदयाची धडधड वाढणे, अस्वस्थता किंवा छातीत धडधड जाणवणे ही लक्षणे दिसू शकतात. मात्र यामागे इतर कारणेही असू शकतात.

  • Que: रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

    Ans: मीठाचे प्रमाण कमी करणे, फळे-भाज्या वाढवणे, संपूर्ण धान्ये खाणे आणि जंक फूड टाळणे उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Heart rate suddenly increases these changes in lifestyle will keep hypertension under control health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
3

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
4

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.