Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लैंगिकतेबाबत तुमची मुलं देखील प्रश्न विचारुन हैराण करतात ? पालक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ?

सेक्स किंवा सेक्शुअल एज्युकेशन म्हटलं तर आजही या समाजात तितकसं खुलेपणाने बोललं जातं नाही. त्यामुळे हा याबाबत कुतुहल निर्माण होतं मुलांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे पालकांना कळत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 07:22 PM
लैंगिकतेबाबत तुमची मुलं देखील प्रश्न विचारुन हैराण करतात ? पालक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ?
Follow Us
Follow Us:
  • लैंगिकतेबाबत तुमची मुलं देखील प्रश्न विचारुन हैराण करतात ?
  • पालक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ?
तंत्रज्ञान विकसित होत गेलं मात्र अजूनही आपल्या समाजात काही विचारांचा किंवा गोष्टींचा एक टॅबू आहे. त्यातीलच एक विचार म्हणजे लैंगिकता. खरंतर सेक्स किंवा सेक्शुअल एज्युकेशन म्हटलं तर आजही या समाजात तितकसं खुलेपणाने बोललं जातं नाही. त्यामुळे हा याबाबत कुतुहल निर्माण होतं मुलांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे पालकांना कळत नाही. म्हणून मुलांच्या प्रश्नांचा उत्तरं देताना पालकांची कशी भूमिका असावी हे जाणून घेऊयात.

लैंगिकता म्हणजे चुकीचं किंवा अश्लील याच दृष्टीकोनातून जास्त प्रमाणात पाहिलं जातं. लैंगिकता हा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि विशेषतःटिनेजर मुलांच्या. टीनेजरमधली मुलं जसजशी वाढत जातात त्यांचा विकास होत जातो त्याप्रमाणे खासगी अवयवांबद्दल किंवा आपल्या लैंगिकतेबद्दल बोलणं, चर्चा करणं हे त्यांच्यासाठी अगदी सामान्य आहे .यामध्ये पालकांना वावगं वाटणं अगदीच गरजेचं नाही. वाढत्या वयासह मुलांमध्ये लैंगिकतेबाबत प्रश्न निर्माण होणं हे अगदी नैसर्गिक आहे आणि सर्व वयोगटातील मुलांना हे प्रश्न पडतातच. खरंतर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. जसजसं वय वाढणार तसतशी मुलं अशा प्रकारचे प्रश्न विचारणार याची तयारी पालकांनी आधीपासूनच करायला पाहिजे. साधारण मुलांना कोणत्या वयापासून लैंगिकतेविषयी प्रश्न पडतील आणि त्याची कशी उत्तरं द्यायची आहेत हे जाणून घेऊया.

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा

पालकांची भूमिका काय असली पाहिजेत ?

तुमच्या मुलाला आधीपासून काय माहित आहे हे तुम्ही आधी जाणून घ्या. प्रश्न विचारून संभाषणाची सुरुवात करून द्या. काही मुलं प्रश्न विचारण्यास गोंधळत असतील तर मुलं तुम्हाला लाजिरवाणे प्रश्न विचारून तुमची परीक्षाही घेऊ शकतात हे आधी लक्षात घ्या. मात्र पालक म्हणून तुम्ही मोकळेपणाने त्यांच्याशी बोला आणि तुमच्या मुलाला तुम्ही कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देऊ शकता याबाबत एक आश्वासन आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून द्या.

आता मूल जेव्हा प्रश्न विचारतं तेव्हा पालकांनी अशा वेळेला काय करावं असा प्रश्न पालकांना पडतो. तर त्याबाबत आपण जाणून घेऊया.

    • मुलांचा प्रश्न कितीही गोड वाटला तरी हसू नका किंवा त्याला टाळू नका.
    • शांत रहा. जास्तच अवघडल्यासारखं वाटलं तर गंभीर दिसण्याचा प्रयत्न करू नका.
    • थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात त्यांना सांगा. साधं उत्तर द्या.
    • कारण मुलांना त्यातले बारकावे नको असतात. प्रामाणिक रहा.
    • जर त्यांनी तुम्हाला काही विचारलं तर त्याची अचूक माहिती द्या.
    • शरीराच्या सर्व अवयवांची योग्य नावं वापरा. या सगळ्याने तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का हे त्यांना हमखास विचारा.
    • तुमच्या मुलांच्या प्रतिक्रिया आणि विचारांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. संयम ठेवा आणि गरज पडल्यास पुन्हा सांगण्यास तयार रहा.

दीड वर्षापासून तीन वर्षाच्या मुलापर्यंतचे प्रश्न

आता साधारण दीड वर्षापासून तीन वर्षाच्या मुलापर्यंतचे प्रश्न काय असतात आपण जाणून घेऊया.

  • ‘मूल सगळ्यात पहिल्यांदा आईला विचारतं की मी कुठून आलो?
  • तुझ्या पोटात मी कसा गेलो? पोटातून मी बाहेर कसा आलो? तर याबद्दल काय उत्तर द्यायची आहेत ही सुद्धा जाणून घेऊया.
  • पालकांनी यावर काय उत्तर द्यावं? तर साधारणतः तीन वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांचं शरीर कशा पद्धतीने कार्य करतं हे सांगावं.
  • शरीराबाबत कोणतीही जबरदस्ती होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • मिठी मारणं, चुंबन घेणं अस्वस्थ वाटेल या त्यांच्या भावना समजून घ्या.
  • त्यांच्या गुप्तांगाना स्पर्श करू शकतात या गोष्टी त्यांना समजावून सांगा आणि त्या का वेगळ्या आहेत हे देखील समजावून सांगा.त्यांना ओरडू नका, नीट समजावा.
अशा पद्धतीने मुलांनी संवाद साधताना पालक म्हणून तुम्ही संयम राखणं महत्वाचं आहे. मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पालकांचा काय बोलावं ते कळत नाही पण अशावेळी शांत राहून योग्य ती उत्तरं देता आली की मुलं आणि पालकांमधला संवाद वाढतो. नाहीतर सतत ओरडल्याने पालक आणि मुलांमधलं अंतर वाढतं आणि मुलं नको त्या गोष्टींकडे ओढली जातात त्यामुळे मुलांशी संवाद वाढवला पाहिजे.

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Web Title: Are your children also asking questions about sex that are confusing what should you do as a parent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • health
  • lifestlye tips
  • mental health

संबंधित बातम्या

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
1

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी

वाढदिवस ठरला कठीण दिवस! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुग्णालयात, बॉयफ्रेंडच्या भावनिक पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता
2

वाढदिवस ठरला कठीण दिवस! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुग्णालयात, बॉयफ्रेंडच्या भावनिक पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर
3

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.