अतुल परचुरे यांचे कॅन्सरने निधन
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे विनोदी कलाकार अतुल परचुरे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी केलेली पु. ल. देशपांडे यांची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहे. अतुल परचुरे यांनी मराठी चित्रपट, हिंदी मालिका, मराठी शो मध्ये काम केले आहे. मात्र काही दिवसांआधी अतुल परचुरे यांना कर्करोग झाला होता. त्यांना यकृताचा कर्करोग झाला होता, असे त्यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. अनेक दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरु होते. मात्र काल अखेर त्यांची प्राण ज्योत मालवली.
वर्षभरापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये अतुल परचुरे यांनी कर्करोग झाल्याचे सांगितले होते. मित्राम्हणे या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अतुल परचुरे कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियाच्या ट्रीपवर गेले होते. तट्रिप पूर्ण करून आल्यानंतर त्यांना मळमळ होऊ लागली आणि कोणतेच पदार्थ खाण्याची इच्छा होत नव्हती. नंतर डॉक्टरांनी त्यांना अल्ट्रासोनोग्राफी करण्यास सांगितली त्यात त्यांना यकृताचा कॅन्सर झाला आहे हे आढळून आले. चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित असे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबदल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हे देखील वाचा: वयाच्या २० मध्ये हाडांमधील कॅल्शियम कमी झालं आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
आरोग्यसाठी किवी अतिशय गुणकारी आहे. किवी खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही किवीचे सेवन करू शकता. किवी खाल्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होऊन जातो. तसेच हे फळ डीएनएला खराब होण्यापासून वाचवते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. किवीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि पाण्याचे प्रमाण कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
अनेकदा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे शरीर निरोगी आणि मजबूत राहते. सफरचंदमध्ये असलेले गुणधर्म कोलन कॅन्सरचा धोका कमी करतो. सफरचंदमध्ये आढळून येणारे फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढू देत नाहीत.
रोजच्या आहारात विटामिन सी युक्त फळांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही गोड लिंबू, संत्री, लिंबू, मोसंबी इत्यादी फळांचे सेवन करू शकता. ही फळे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. विटामिन सी युक्त फळांचे सेवन केल्यामुळे पोटामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. यासोबतच तुम्ही टरबूज आणि इतर फळे सुद्धा खाऊ शकता.
हे देखील वाचा: रताळ्याचे हे 9 फायदे तुम्हाला माहितेय?
माश्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने आढळून येतात. ज्यामुळे स्तन आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी होऊन आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. माश्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्च्या स्त्रोत अधिक प्रमाणात असतो.