(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकतच जगभर ‘मन धावतंया’ हे गाणं गाजत असताना राधिका भिडेचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘उत्तर’ या आगामी मराठी चित्रपटामधून हो आई” या गाण्यातून राधिका पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणार आहे. हे गाणं सध्या चाहत्यांना आवडत आहे. तसेच राधिकाचे चाहते देखील खुश झाले आहेत. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहे. आणि पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘उत्तर’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड
सध्याचा जगभरात गाजणारा, तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे ‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचा आहे. याच राधिकाने गायलेलं पहिलं वहिलं मराठी चित्रपट गीत “हो आई!” सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. ‘उत्तर’ या आगामी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि ‘तू आहेस म्हणून मी आहे’ ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे. ‘उत्तर’ चित्रपटाच्या टीझरने रसिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. “हो आई” हे गाणं नक्कीच आजच्या तरुणाईला पसंत पडणार आहे.
या गाण्याचे बोल सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांचे असून यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन या जोडीने ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं’ आणि ‘तुला जपणार आहे’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्याला हळूवारपण जपणारं, अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं ‘हो आई!’ हे नवं गाणं ‘उत्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील असं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला ‘थँक यू’ म्हणण्याची संधी देणारं हे निश्चित आहे.
११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘उत्तर’ या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १२ डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






