
नवजात बालकांसाठी आईचे दूध ठरतंय विष! दुधातील यूरेनियममुळे बालकांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका
आईच्या दुधात युरेनियम वाढण्याची कारणे?
आईंच्या दूधात युरेनियम कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळून आले?
युरेनियमची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही भावना अतिशय सुखद आणि आनंद देणारी आहे. जन्म झाल्यानंतर बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध अतिशय प्रभावी आणि अमृतासमान मानले जाते. आईच्या दुधामुळे बाळाच्या शरीराची वाढ होते आणि पोषण मिळते. पण याच दुधामुळे बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. जगभरात सगळीकडे वेगवेगळ्या गंभीर आजारांची रुग्ण संख्या वाढत आहे. आजाराची लागण शरीराला झाल्यानंतर बऱ्याचदा मृत्यू होतो तर योग्य उपचार घेतल्यास पुन्हा नव्याने जीवन जगता येते. वेगवेगळ्या गंभीर आजारांवर संशोधनदेखील सुरु आहे. पण नवजात बालकांच्या मृत्यूमुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. बालकांच्या मृत्यूमागील कारण ऐकून सगळ्यांचं धक्का बसेल. नवजात बालकांचा मृत्यू आईच्या दुधाने होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत 6 जिल्ह्यांमध्ये ४० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला आईचे दूध बालकांसाठी नेमके का विषारी ठरते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बिहारमधील भोजपूर, समस्तीपुर, बेगूसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा या जिल्ह्यांमध्ये स्तनपान करणाऱ्या ४० महिलांच्या दुधात युरेनियम (U-238) चे प्रमाण 0 ते 5.25 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळून आले आहे. यामध्ये खगडियात सार्वधिक महिलांची नोंद करण्यात आली असून नालंदामध्ये सगळ्यात कमी महिलांची नोंद करण्यात आली आहे. कटिहारमधील एका नमुन्यात कमाल प्रमाण सापडले आहे. आईच्या दुधात युरेनियम आढळून आल्यामुळे सगळ्यांचं खूप मोठा धक्का बसला आहे. आईचे दूध नवजात बालकांसाठी अतिशय महत्वाचे असते. बालकांच्या शरीराचा संपूर्ण विकास आईच्या दुधावर होतो. पण युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान पटनातील महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांच्या नेतृत्वाखाली AIIMS दिल्लीतील डॉ. अशोक शर्मा यांच्या संपूर्ण टीमने महिलांच्या दुधाचे नमुने तपासले होते. त्यांनी १७ ते ३५ वयोगटातील महिलांच्या दुधाचे नुमने तपासणीसाठी नेले होते. आईच्या दुधात आढळून आलेले युरेनियम बालकांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याबद्दल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अधिक तपास करत आहे. औद्योगिक कचरा, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा दीर्घकाळ वापर इत्यादी गोष्टींमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणचा धोका लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो.
आईचे दुधातील युरेनियम लहान मुलांच्या शरीरात गेल्यानंतर अन्नसाखळीत प्रवेश करते. यामुळे किडनी, मज्जासंस्था, मुलांमध्ये विकासात्मक विकृती आणि कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. अभ्यासानुसार, ७०% शिशुंना गैर-कर्करोगजन्य आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विकसनशील अवयव, जास्त विषारी पदार्थ शोषण इत्यादींमुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढण्याची जास्त शक्यता असते. आईच्या दुधातील युरेनियम लहान मुलांच्या अन्नसाखळीत पोहचल्यानंतर कर्करोग आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करते. लहान मुलांचे जीवन वाढवण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे फार आवश्यक आहे.
Ans: अभ्यासांमध्ये बिहार, भारतातील काही जिल्ह्यांत स्तनपान करणाऱ्या मातांच्या दुधामध्ये युरेनियमचे अंश आढळले आहेत.
Ans: आईच्या दुधात युरेनियमच्या सुरक्षित पातळीसाठी कोणतेही आंतरराष्ट्रीय मानक किंवा नियम ठरवण्यात आलेले नाहीत.
Ans: काही अभ्यासांनी मूत्रपिंडाचे नुकसान, न्यूरोलॉजिकल समस्या (मेंदूचा विकास) आणि भविष्यात कर्करोगाचा धोका दर्शवला आहे.