वेट लॉससाठी पेरू सीक्रेट फॉर्म्युला! महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल
वजन कमी करण्यासाठी कोणते फळ प्रभावी?
पेरू खाण्याचे फायदे?
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी उपाय?
जगभरात वाढलेले वजन, लठ्ठपणा आणि आरोग्यासंबंधित इतर अनेक आजारांच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. शरीरावर चरबीचाअनावश्यक घेर वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो.पण यामुळे कोणताही परिणाम शरीरावर लगेच दिसून येत नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य जीवनशैली आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन
जीवनशैलीत केलेल्या छोट्या मोठ्या चुकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच पौष्टीक आणि संतुलित आहार घ्यावा. बऱ्याचदा पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला दिवसभरात एक वेळ जेवण करतात. पण जास्त वेळ उपाशीपोटी राहिल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्याऐवजी शरीरात अशक्तपण, थकवा वाढू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात जिम, डायट, फॅन्सी सुपरफुड्, प्रोटीन शेक्स, पण आपल्या घरात अगदी सहज मिळणारा, साधा आणि स्वस्त असा एक फळ वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी आहे हे अनेकांना माहीतच नसते. हे फळ म्हणजे पेरू, होय, हा साधा हिरवा पेरू तुमचं वजन कमी करण्याचा ‘सीक्रेट फॉर्म्युला’ ठरू शकतो.
पेरूमध्ये विटामिन सी, भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि शरीराला आवश्यक असणारी अनेक सूक्ष्म पोषणद्रव्यं असतात. विशेष म्हणजे, सकाळी रिकाम्या पोटी अमरूद खाल्ल्यास वजन कमी होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने आणि नैसर्गिकरीत्या सुरू होते. अनेक फिटनेस एक्स्पर्ट्स आणि डायटिशियन पेरूला ‘सुपर स्लिमिंग फूड’ मानतात. त्याचं कारणही तितकंच दमदार आहे. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि पोट भरून राहणारी क्षमता.
सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्यानं पचनाला गती मिळते. रात्रीचा घेतलेला अन्नाचा अवशेष योग्य प्रकारे साफ होतो आणि आतड्यांची हालचाल सुधारते. फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे दिवसभर अनावश्यक भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंगवर नियंत्रण राहतं. हेच वजन कमी करण्यातील सर्वात मोठं पाऊल आहे.
पेरू इन्सुलिन लेव्हलला स्थिर ठेवतो. विशेष म्हणजे ज्या लोकांना ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यात अडचणी येतात त्यांच्यासाठी अमरूद अत्यंत उपयुक्त आहे. सकाळी पेरू खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही आणि शरीरातील ऊर्जेचं प्रमाण संतुलित राहतं.त्यामुळे थकवा येत नाही आणि दिवसभरातील कार्यक्षमता टिकून राहते.
वय वाढल्यानंतर शरीरासंबंधित अनेक समस्या उद्भवतात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने
पेरूमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात. शरीरात सूज किंवा इन्फ्लेमेशन असेल तर वजन कमी होत नाही. हा अनेकांना न समजणारा मुद्दा आहे. पेरू नियमित खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मेटाबोलिझम (चयापचय) वेगानं काम करतं. मेटाबोलिझम वाढला की शरीर होऊ लागते. जास्त कॅलरी जाळतं आणि चरबी कमी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल.
पेरूचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात असणारा विटामिन सी चा भरपूर पुरवठा. विटामिन सी हे इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं. वजन कमी करताना शरीर कमकुवत होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणं महत्त्वाचं आहे. पेरू एकाचवेळेस स्लिमिंग आणि इम्युनिटी बूस्टिंग दोन्ही फायदे देतो.
Ans: शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे.
Ans: शारीरिक हालचालींचा अभाव, कौटुंबिक इतिहास किंवा जीन्सचा प्रभाव
Ans: मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल






