लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' भाजीचे सेवन
लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
मुळ्याची भाजी खाण्याचे फायदे?
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण का होतात?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच सक्रिय आणि हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यातील अतिमहत्वाच्या अवयव म्हणजे लिव्हर. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यापासून ते अगदी रक्त शुद्ध करण्यास मदत होते. लिव्हर शरीरासाठी ५० पेक्षा जास्त कामे करते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या चुकांमुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे येतात. जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीमुळे लिव्हरचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. ज्यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या भाजीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाजीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. त्यातील अनेकांना आवडणारी भाजी म्हणजे मुळा. मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय भाजीमध्ये असलेल्या ग्लुकोसिनोलेट्समुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे काहीवेळा पोट फुगणे, पोटात जडपणा जाणवणे, थकवा आणि इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरातील विषारी घटकांचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे पचनसंस्थेवर आलेला भार कमी होऊन शरीर स्वच्छ होते.
मुळ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. या घटकांमुळे लिव्हरभोवती जमा झालेला चरबी नष्ट होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात मुळ्याच्या भाजीचे दोनदा सेवन करावे. यामुळे नैसर्गिकरित्या शरीर सुद्धा स्वच्छ होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मुळ्याची भाजी प्रभावी ठरेल.
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना
मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पेशींचे रक्षण होते. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शरीरावरील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. प्रदूषण, ताण किंवा गोळ्या औषधांच्या अतिसेवनामुळे लिव्हर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम कमी करण्यासाठी मुळा खावा.
Ans: सुरुवातीच्या टप्प्यात लिव्हर डॅमेजची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत
Ans: अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आणि सिरोसिस
Ans: अल्कोहोल टाळणे, निरोगी आणि संतुलित आहार घेणे.






