(फोटो सौजन्य: Pinterest)
टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने काय होते?
टोमॅटोत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन आणि लायकोपीन सारखे काही पोषक घटक आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे ठरतात. हे घटक त्वचेला उजळ बनवण्यास आणि त्वचा हेल्दी राखण्यास मदत करतात. हेच कारण आहे की, चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो.
त्वचा राहते फ्रेश
जर रोजच्या कामामुळे आणि ताणामुळे तुमचा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसत असेल तर यासाठी टोमॅटोचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. यासाठी टोमॅटोचा रस एका वाटीत काढून हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावर हा रस लावा. साधारण १० ते १५ मिनिटे टोमॅटोचा हा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि मग फेसवाॅशने आपला चेहरा स्वच्छ धुवा.
पिंपल्ससाठी कसा वापर करावा?
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करु शकता. यात आढळणारे अँटीऑक्सीडंट कंपाउंड्स त्वचेला दुरुस्त करण्यात आणि पिंपल्सना पळवून लावण्यात फायदेशीर ठरतात. यामुळेच पिंपल्स आणि तेलकट त्वचेसाठी टोमॅटोचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.
Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
काळे डाग दूर करण्यात सनस्क्रिन ठरते मदतनीस
पिंपल निघून गेल्यानंतर चेहऱ्यावर जे डाग राहतात त्यांना पोस्ट-इन्फ्लेमेटरी हाइपरपिग्मेंटेशन असे म्हटले जाते. हे डाग हळूहळू हलके होतात ज्यात बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या डागांना गडद होण्यापासून रोखण्यासाठी सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होणे फार गरजेचे असते. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, जर तुमच्या चेहऱ्यावर मोठे आणि वेदनादायी मुरुम असतील, नवीन मुरुम पुन्हा येत असतील, किंवा मुरुम बरे झाल्यानंतर काळे डाग किंवा व्रण तयार होत असतील, तर तुम्ही केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. बऱ्याच काळापासून जर चेहऱ्यावरील डाग अनेक उपाय केल्यानंतरही जर दूर होत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही डर्मेटोलॉजीस्टचा सल्ला घेऊ शकता.






