Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या

Which Lentils Has More Protein: मूग, तूर आणि चणा डाळ या तिन्ही डाळी प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्या तरी त्यांच्या पोषणमूल्यांमध्ये आणि आरोग्यदायी फायद्यांमध्ये फरक आहे. त्यामुळे वय, आरोग्य आणि शरीराच्या गरजेनुसार योग्य डाळ निवडल्यास संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे अधिक सोपे होते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 02, 2026 | 07:09 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मूग, तूर की चणा?
  • प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम
  • कोणती डाळ निवडावी?
भारतीय जेवणात डाळ हा केवळ चवीचा भाग नसून उत्तम आरोग्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो. शाकाहारी आहार घेणाऱ्यांसाठी डाळी प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहेत. बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध असल्या तरी मूग, तूर आणि चणा डाळ यांचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की, या तिन्हींपैकी सर्वाधिक पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध डाळ कोणती? मात्र, याचे एकच उत्तर नाही. प्रत्येक डाळीची पोषणरचना वेगळी असून तिचे आरोग्यदायी फायदेही भिन्न आहेत. त्यामुळे आपल्या वय, आरोग्य आणि आहाराच्या गरजेनुसार डाळ निवडणे अधिक योग्य ठरते.

Anxiety Attack: घाबरणे, धडधड अन् श्वास घ्यायला त्रास? मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नका; अशी ओळखा एंग्झायटी अटॅकची लक्षणे

मूग डाळ : हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक

मूग डाळ पचनसंस्थेसाठी हलकी मानली जाते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारातून सावरत असलेल्या व्यक्तींसाठी ती उत्तम पर्याय ठरते. यात प्रथिनांसोबतच फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात. ही डाळ शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

तूर डाळ : रोजच्या जेवणातील संतुलित पर्याय

तूर डाळ अनेक घरांमध्ये नियमित बनवली जाते. या डाळीत प्रथिने, लोह, पोटॅशियम आणि बी-समूहातील जीवनसत्त्वे आढळतात. नियमित प्रमाणात तिचे सेवन केल्यास स्नायूंच्या कार्याला आधार मिळतो आणि शरीराच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते.

चना डाळ : प्रथिने आणि फायबरचा उत्तम मिश्रण

चना डाळीत प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारख वाटते. वजन नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तसेच संतुलित आहार घेणाऱ्यांसाठी ही डाळ फायदेशीर मानली जाते. याशिवाय शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यासही मदत होते.

कोणती डाळ निवडावी?

एकाच डाळीला सर्वश्रेष्ठ म्हणणे योग्य नाही. पचनाचा त्रास असल्यास मूग डाळ अधिक उपयुक्त ठरू शकते. रोजच्या आहारासाठी तूर डाळ संतुलित पर्याय आहे, तर अधिक फायबर आणि प्रथिनांची गरज असल्यास चणा डाळ निवडता येते. आहारात या तिन्ही डाळींचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

निरोगी शरीरासाठी केवळ प्रथिनांचे प्रमाण नव्हे, तर संतुलित पोषणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या डाळीवर अवलंबून न राहता विविध डाळींचा समतोल आहारात समावेश करा. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली यांच्या मदतीने शरीराला आवश्यक पोषण मिळू शकते आणि दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकवून ठेवता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Fatty liver: फॅटी लिव्हरबाबत जनजागृतीसाठी जसलोक हॉस्पिटलचा पुढाकार; ‘लिव्हर फेस्ट सीझन 2’ चे आयोजन

Web Title: Best dal for protein moong vs toor vs chana dal benefits healthy indian diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • food news
  • healthy food
  • moong dal

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
2

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
3

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.