Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर… इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद

Monsoon Travel : महाराष्ट्रात असे अनेक ठिकाण आहेत जे पावसाळी पर्यटनासाठी खास करुन ओळखले जातात. याकाळात इथे हिरवीगार वनराई, धबधबे आणि किल्ल्यांवर ट्रेकिंगचा सुंदर अनुभव घेता येतो. अनेक ठिकाणी तर धुक्याची अशी चादर पसरते की पाहून मंत्रमुक्त झाल्यासारखं वाटतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 08:09 AM
पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर... इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद

पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर... इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रात अनेक आकर्षक ठिकाणे पर्यटकांना खुणावतात.
  • हिरवाई, धबधबे, धुक्याने नटलेले डोंगर आणि शांत वातावरणामुळे विकेंड ट्रिपसाठी ही ठिकाणे उत्तम मानली जातात.
  • मुंबईपासून सहज पोहोचता येणाऱ्या या पर्यटनस्थळांवर कुटुंब आणि मित्रांसोबत संस्मरणीय वेळ घालवता येतो.
पावसाळ्यात अनेक ठिकाणांचे साैंदर्य द्विगुणित होते. आजूबाजूची हिरवळ आणि वातावरणातील गारवा मनाला शांतता देऊन जातो. याकाळात अनेक पर्यटनस्थळांची सुंदरता आणखीनच वाढते ज्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणांना भेट देणे एक चांगला पर्याय ठरतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, महाराष्ट्रात अशी काही सुंदर ठिकाणे आहेत जी पावसाळी पर्यटनासाठी खास मानली जातात. इथे तुम्हाला पाण्याचा धबधबा, हिरवळ, चविष्ट स्ट्रीट फूड आणि उत्तम फोटोज काढता येतील. मुख्य म्हणजे ही ठिकाणे मुंबईपासून काही अंतरावर असल्याने एका दिवसात तुमची ट्रीप पूर्ण होऊ शकते. विकेंड ट्रीपसाठी कुटुंबासोबत कुठे मोकळा वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणांची निवड तुम्ही नक्कीच करु शकता.

Instagrammable Places In India : ट्रॅव्हल आणि फोटोशूटसाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत देशातील ही 5 ठिकाणे

लोणावळा

मुंबई आणि पुणेकरांना पावसाळ्यात फिरण्यासाठी लोणावळा हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ मानले जाते. पावसाळ्यात या ठिकाणाच्या साैंदर्यात भर पडते आणि निसर्गसाैंदर्याचा एक सुंदर अनुभव इथे घेता येतो. इथे तुम्ही ट्रेकिंग, बोटिंग आणि संध्याकाळी विहंगम सूर्यास्ताच्या दृष्यांचा आनंद घेऊ शकता. गराली तलाव, भाजा लेणी, कुणे धबधबा, भुशी धरण, राजमाची किल्ला, टिकोना आणि नारायणी धाम मंदिर हे लोणावळ्यातील लोकप्रिय ठिकाणे आहेत.

कोलाड

मुंबईपासून सुमारे ११७ किमी अंतरावर, रायगड जिल्हात कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले हे ठिकाण पावसाळी पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. इथे तुम्ही तामिनी घाट धबधबा, भीरा धरण, घोसळा किल्ला, सुतारवाडी तलाव आणि देवकुंड धबधबा अशा ठिकाणांना भेट देऊ शकता. प्रवासप्रेमी असाल तर इथे तुम्हाला अनेक नवीन गोष्टींचा आनंद घेता येईल. बस, टॅक्सी किंवा रेल्वे अशा तीनही मार्गांनी तुम्ही मुंबईहून कोलोड गाठू शकता.

इगतपुरी

इगतपुरी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पावसाळी पर्यटनस्थळ मानले जाते. याकाळात इथे दाट धुक्याची चादर पसरते जे पाहताना फार छान वाटते. हे ठिकाण मुंबई आणि नाशिकपासून अगदी जवळ आहे. रोजच्या गजबटापासून दूर कुठे शांत ठिकाणी निसर्गासोबत आपला वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. भातसा नदीचे खोरे, कामेल व्हॅली, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर आणि घाटदेवी मंदिर यांसारख्या ठिकाणांना इथे भेट देता येऊ शकते.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये महाबळेश्वरचे नाव आवर्जून घेतले जाते. इथे धुक्याची चादर, हिरवळ, धबधबे आणि लोकल मार्कटला फिरता येते. इथून तुम्ही स्वस्त दरात स्ट्राॅबेरी आणि ब्लूबेरी खरेदी करु शकता. महाबळेश्वरमध्ये लिंगमळा धबधबा, आर्थर्स सीट, वेण्णा लेक, एलिफंट्स हेड पॉईंट, मॅप्रो गार्डन, प्रतापगड किल्ला या ठिकाणांना भेट देता येते. हे ठिकाण फिरायचं तर महाबळेश्वरला तीन ते चार दिवसांचा मुक्काम करावा लागतो.

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘‘पॅरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

कर्नाळा

कर्नाळा हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. चारही बाजूंनी पसरलेले हिरवळीचे वातावरण ठिकाणाच्या साैंदर्यात भर घालते. तुम्ही इथे ट्रेंकींगचा उत्तम आनंद घेऊ शकता. ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला इथे सुंदर पक्ष्यांचेही दर्शन होईल. इथे ट्रेकिंगसाठी लोक कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ल्याची निवड करतात.

Web Title: Best monsoon tourist places near mumbai in maharashtra for weekend trip waterfalls greenery and nature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • maharashtra
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
1

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर
2

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?
3

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.