Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : खर्च कमी, आनंद दुप्पट! हनिमूनसाठी परफेक्ट आहेत भारतातील ही ठिकाणे

Honeymoon Destination : कमी बजेटमध्ये सुंदर, शांत आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये असलेच पाहिजेत. हनिमून डेस्टीनेशनसाठी तुम्ही यांची निवड करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 08:35 AM
Travel News : खर्च कमी, आनंद दुप्पट! हनिमूनसाठी परफेक्ट आहेत भारतातील ही ठिकाणे

Travel News : खर्च कमी, आनंद दुप्पट! हनिमूनसाठी परफेक्ट आहेत भारतातील ही ठिकाणे

Follow Us
Close
Follow Us:
  • कमी गर्दी आणि शांत वातावरणामुळे ही ठिकाणं हनिमूनसाठी खास मानली जातात.
  • बर्फाच्छादित पर्वत, निळाशार समुद्र आणि हिरव्यागार दऱ्या ट्रिपचा आनंद दुप्पट करतात.
  • मुंबईहून फ्लाइट, ट्रेन आणि रोड ट्रिपद्वारे या सुंदर ऑफबीट डेस्टिनेशन्सला सहज पोहोचता येते.
उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीजन. उन्हाळा आता संपत आला असून लोकांनी आता हनिमून प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे. हनिमूनसाठी अधिकतर लोक शांत आणि सुंदर ठिकाणांची निवड करतात. पण अशा ठिकाणांना भेट द्यायची म्हणजे पाकिट रिकामं करण्यासारखं आहे. जगात अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत ज्यांची पर्यटनासाठी निवड केली जाते. पण स्मार्ट पद्धतीने विचार केलात तर कमी खर्चातही सुंदर ठिकाणांना भेट देता येऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, देशात असे काही ऑफबीट डेस्टीनेशन्स आहेत जिथे भेट देऊन तुम्ही तुमच्या ट्रीपचा आनंद दुप्पट करु शकता आणि यात तुमचे फार पैसेही खर्च होणार नाही. मुख्य म्हणजे फार लोकप्रिय नसल्याने इथे लोकांची गर्दी देखील पाहायला मिळत नाही ज्यामुळे शांततेत आणि मनसोक्तपणे ट्रीपचा आनंद लुटता येतो.

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे

औली

हनिमूनसीठी परफेक्ट डेस्टीनेशन शोधत असाल तर औली तुमच्यासाठी एक योग्य निवड आहे. इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत देशातील सर्वात मोठ्या तलावाच्या काठावर चांगला वेळ घालवू शकता. याचबरोबर बर्फाने भरलेल्या पर्वतावर तुम्ही स्कीइंग करत तुम्ही चित्तथरारक आणि मनमोहक दृष्यांची मजा लुटु शकता. इथले साैंदर्य इतके अद्भूत आणि सुंदर आहे की एकदा गेल्यावर इथून परत येण्याचा विचार तुमच्या मनात येणारच नाही. हे एक असे ठिकाण आहे जे परदेशालाही तोडीस तोड टक्कर देते.

मुंबईहून कसं जायचं?

  • विमानाने जायचे असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डेहराडूनला जाण्यासाठी थेट फ्लाईट्स उपलब्ध मिळतील. इथून तुम्ही टॅक्सा करुन जोशीमठला जाऊ शकता आणि मग इथून औली हे ठिकाण १६ किमी लांब आहे.
  • रेल्वेचा प्रवास निवडत असल्यास तुम्हाला मुंबईहून हरिद्वार किंवा ऋषिकेशसाठी ट्रेन करावी लागेल आणि मग तिथून रस्ता मार्गाने आधी जोशीमठ आणि मग तिथून औलीला पोहचता येईल.
अंदमान बेट

निळेशार समुद्र, स्वच्छ पांढरी वाळू आणि हिरवळीने भरलेले जंगल… निसर्गाने तुडुंब भरलेल्या या ठिकाणी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन जाल तेव्हा पर्यटनाचा आनंद संस्मरणीय होईल. अनेकांना अंदमान बेटाची माहिती आहे पण पर्यटनासाठी फार लोक इथे जात नाहीत ज्यामुळे तुम्ही इतरांहून वेगळं काहीस करत या ठिकाणाची निवड करु शकता. तुम्हीही हनिमूनसाठी एक वेगळे आणि सुंदर ठिकाण शोधत असाल तर अंदमान तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. इथे तुम्ही हातात हात घालून सूर्यास्ताचीही मजा लुटु शकता. यासाठी तुम्हाला विमान प्रवासाची निवड करावी लागेल.

मुंबईहून कसं जायचं?

मुंबईहून अंडमानला जाण्यासाठी सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे फ्लाइट. अंडमानची राजधानी Port Blair येथे पोहोचण्यासाठी मुंबईहून थेट किंवा कनेक्टिंग फ्लाइट्स उपलब्ध असतात.

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

विमानाने सर्वात सोपा पर्याय

  • मुंबई → चेन्नई / कोलकाता / बेंगळुरू → पोर्ट ब्लेअर असा मार्ग सर्वाधिक वापरला जातो.
  • काही दिवस थेट फ्लाइट्सही उपलब्ध असतात.
  • प्रवासाचा कालावधी साधारण 4 ते 8 तास असू शकतो
शिलाँग

हनिमूनसाठी आणखी एक सुंदर ऑफबीट डेस्टीनेशन म्हणजे शिलाँग. हिरवीगार दरी, निळसर आकाश आणि दुधासारखे धबधबे यामुळे ठिकाणाच्या साैंदर्यात आणखीनच भर पडते. इथली खासियत म्हणजे इथेच देशातील सर्वात मोठा नोहकालीकाई धबधबा आहे ज्याच दृष्य पाहताना फार सुंदर वाटतं. तुम्ही इथे गेलात तर या धबधब्याला पाहायला विसरु नका.

मुंबईहून कसं जायचं?

  • तुम्हाला मुंबईवरुन विमानाने किंवा रेल्वेने आधी गुवाहतटीला जावे लागेल.
  • मग तिथून तुम्ही शिलाँगसाठी ट्रक्सी करु शकता.

Web Title: Best offbeat honeymoon destinations from mumbai under budget travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • honeymoon destintions
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे
1

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?
2

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा
3

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या
4

महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.