(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा
या छिद्रातून सूर्याचा प्रकाश जेव्हा गुफेच्या आत जाते तेव्हा ते पाहायला आणखीनच छान वाटते. त्याचबरोबर जेव्हा जोरदार पाऊस सुरु होतो तेव्हा पाणी गुफेच्या आत जाते. यावेळी असं वाटतं जणू देव रडत आहे आणि देवाचे अश्रू धर्तीवर पडत आहेत. गुफेचे साैंदर्य इतके अनोखे आणि अद्भूत आहे की जगभरातून पर्यटक ही गुफा पाहण्यासाठी येतात.
कुठे आहे गुफा?
खरंतर ही गुफा बल्गेरियाची राजधानी सोफियापासून काही तासांच्या अंतरावर आहे. या गुफेला बल्गेरियातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. या गुफेत तुम्हाला खडकांच्या अद्भूत रचना पाहायला मिळतील. गुफेला देवाचे डोळे म्हणत असले तरी याचे मूळ नाव प्रोहोदना गुफा (Prohodna Cave) असे आहे. याची अनोखी नैसर्गिक बनावट या ठिकाणाच्या साैंदर्यांत आणखी भर घालते.
गुफेच्या आत डोळे कसे तयार झाले?
सांगितले जाते की, हे दोन छिद्र ज्यांना गुफेचे डोळे म्हटले जाते हे आधीपासून इथे नव्हते. हजारो वर्षांपर्यंत हवा, पाणी आणि नैसर्गिक क्षरण यांमुळे गुफेच्या छतावर दोन गोल छिद्रे तयार झाली. ही छिद्रे सुरुवातीला लहान होती पण वेळेसोबत ती मोठी होऊ लागली आणि त्यांना विशाल आकार मिळाला. आता ही छिद्रे अगदी डोळ्यांसारखी दिसू लागतात. निसर्गामुळे गुहेत तयार झालेल्या या छिद्रांमुळेच गुहेला एक वेगळेपण मिळाले आहे जे पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. दिवसा जेव्हा सूर्याची प्रखर किरणे या गुफेवर पडतात आणि यातून प्रकाश बाहेर पडतो तेव्हा गुफा भारीच चमकू लागते.
साहसप्रेमींसाठी खास आहे ठिकाण
ही गुफा फक्त पर्यटकांसाठी नाही तर साहसप्रेमींसाठीही खास मानली जाते. गुफेचे प्रवेशद्वार साधारण १४८ फूट लांब आहे ज्यामुळे इथून बंजी जंपिग आणि राॅक क्लाइम्बिंग करता येते. अनेक लोक फक्त या रोमांचक अनुभवासाठी इथे येतात. उंचावरुन जेव्हा इथे उडी मारली जाते तेव्हा गुफेचे साैंदर्य पाहण्याचा अनुभव फार वेगळा असतो.
रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?
गुफेत झालीये अनेक चित्रपटांची शूटिंग
गुफेचे साैंदर्य इतके सुंदर आणि अद्भूत आहे की, अनेक चित्रपटांची शूटिंग देखील या ठिकाणी पार पडली आहे. १९८८ मध्ये बल्गेरियन चित्रपट ‘टाईम ऑफ व्हायलंस’ (Time of Violence) या चित्रपटाचे काही सीन्स या गुफेत शूट करण्यात आले आहेत. ही गुफा दिवसातील २४ तास खुली असते, इथे जाण्यासाठी कोणतेही बंधन नाही आणि यासाठी कोणते पैसेही आकारले जात नाही. तुम्ही कधी बल्गेरियाला गेलात तर या गुफेला भेट द्यायल विसरु नका.






