
महापालिकेच्या चाचणीत आढळून आले कॅन्सर, मधुमेह, श्वसनाचे रुग्ण
पुणे, शहर प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेचे रुग्णालय, दवाखाने, आयुष्यमान आरोग्य मंदिरे यामध्ये असंसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम जानेवारी २०२५ पासून घेण्यात आला. यात सात लाख नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. एक लाख नागरिकांना असंसर्गजन्य रोगाचे निदान झाले आहे. असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, दीर्घकालीन श्वसन रोग यांचा समावेश होतो. असंसर्गजन्य आजारांना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये कर्करोग मधुमेह हृदयरोग आणि स्ट्रोक प्रतिबंध नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम लागू केला आहे.(फोटो सौजन्य – istock)
या अंतर्गत पुणे महापालिकेच्या १९ रुग्णालये ५४ दवाखाने, ७२ आयुष्यमान आरोग्य मंदिर, या ठिकाणी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात आरोग्याच्या बाबतीत असंसर्गजन्य रोगाचे जलद संक्रमण होत आहे. असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण हे पाण्यामुळे किंवा कीटकांमुळे होणाऱ्या आजारांसारख्या संसर्गजन्य आजारांपेक्षाही रक्तदाब-हृदयविकार, श्वसनविकार, कर्करोग, मधुमेह, बारा महिलांना कॅन्सर; ६१ हजार जणांना रक्तदाब उच्च रक्तदाबाच्या ७२००२७ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये ६१२३१ जणांना उच्च रक्तदाबाचे निदान झाले. मधुमेहाच्या ७०७४०० चाचण्या करण्यात आल्या यामध्ये ३८८६४ जणांना मधुमेहाचे निदान झाले आहे. मुखाचा कर्करोगाच्या ६४७२८२ स्क्रीनिंग करण्यात आल्या त्यामध्ये २८ जणांना कर्करोगाचे निदान झाले. ब्रेस्ट कॅन्सरच्या २९१८५३ स्क्रीनिंग करण्यात आल्या यामध्ये २३ जणांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले. गर्भाशय कॅन्सरच्या १८३९३४ चाचण्या करण्यात आल्या यामध्ये १२ महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले.हृदयरोग कर्करोग दीर्घकालीन श्वसन रोग, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजार एकूण मृत्यू पैकी ६३% मृत्यूचे प्रमाण हे असंसर्गजन्य आजारांमुळे आहे.
परिचारिका, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय परिचारिका, अशा एकूण ४४९ कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम व पोर्टल प्रशिक्षण घेण्यात आले होते. पुणे महानगरपालिका व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने डिसेंबर २०२४ मध्ये ८८ संसर्गजन्य रोगांचे तपासण्या केल्या शिवाय निदान होत नाही. त्यामुळे जवळच्या महापालिकेच्या रुग्णालय दवाखाने यामध्ये जाऊन नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक आहे. हे दीर्घकाळ राहणारे रोग आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी सांगितले आहे.
जानेवारी २०२५ पासून ९ नोव्हेंबर पर्यंत ६३ जणांना कर्करोगाचे निदान झाले आहे. असंसर्ग जन्य रोगांचा वाढता धोका लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वारंवार तपासण्या करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य रोगांचे तपासण्या आणि चाचण्या शिवाय निदान होऊ शकत नाही. गर्भाशयाच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग करण्याकरिता व्हिज्युअल इन्स्पेक्शन बाय ऍसिटिक ऍसिड हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. यात प्रस्तुतीगृहां कडील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका अशा एकूण १३३ जणांचे ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स घेण्यात आले.
पुणे, शहर प्रतिनिधी. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद बारावीच्या (एनसीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयम्’ व्यासपीठाद्वारे मोफत ऑनलाइन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करत आहे. व्यवसाय संचालन, व्यवस्थापन आणि संस्थात्मक वातावरणाच्या संकल्पना समजावून देणे हा उद्देश आहे.
२४ आठवड्यांचा हा कोर्स ६ मार्च २०२६ रोजी संपेल. नोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ असून ऑनलाइन परीक्षा ३ मार्च २०२६ रोजी होईल. आवश्यकतेनुसार परीक्षेची तारीख बदलता येणार आहे. अभ्यासक्रमात व्यवस्थापनाची तत्त्वे, नियोजन, आयोजन, कर्मचारी व्यवस्थापन, दिशा व नियंत्रण अशा आठ विषयांचा समावेश आहे. ३० मॉड्यूल्सच्या या कोर्समध्ये व्हिडिओ घडे, लेखी सामग्री, वेब लिंक्स आणि स्व-मूल्यांकन साधने दिली जातील. विद्यार्थ्यांना चर्चा मंचांद्वारे मदतही मिळेल. इंग्रजी माध्यमातील हा ‘कोअर’ कोर्स व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात रस असणाऱ्या तसेच बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Ans: मधुमेह हा शरीरातील इन्सुलिनच्या पातळीतील दोषांमुळे होतो, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.
Ans: कर्करोग म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होणे, जी आजूबाजूच्या ऊतींवर हल्ला करते आणि शरीरात पसरते.
Ans: धूम्रपान, अस्वास्थ्यकर आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा आणि तणाव.