सुका खोकला, बंद नाकाच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका! बाबा रामदेवांनी सांगितलेले 'हे' उपाय ठरतील प्रभावी
हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या ऋतूनुसार जेवणात सुद्धा बदल करणे तितकेच गरजेचे आहे. हवेतील थंडाव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर वारंवार सर्दी, खोकला, नाक बंद होणे, घशात वाढलेली खवखव, नाकातून सतत सर्दी वाहणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. गळा खवखवतो, बोलताना दम लागतो, झोपताना नाक बंद होऊन इत्यादी अनेक समस्या हिवाळ्यात कायमच जाणवू लागतात. धूळ, माती आणि प्रदूषणाचे हानिकारक कण नाक आणि तोंडात गेल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाबा रामदेवांनी सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास श्वासांच्या समस्या, नाक बंद होण्याच्या समस्येपासून कायमचा आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर बदाम, काळीमिरी आणि खडीसाखर एकत्र करून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात मिक्स करून प्यावे. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. बदाम खाल्ल्यामुळे शरीराला ताकद मिळते. तर खडीसाखर खाल्ल्यामुळे घशात वाढलेली खवखव दूर होते. काळीमिरीच्या सेवनामुळे शरीरात उष्णता वाढून आरोग्य सुधारते. त्यामुळे नियमित बदाम काळीमिरीच्या मिश्रणाचे दुधासोबत सेवन करावे.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. मोहरीच्या तेलामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. नाक बंद होणे, सायनसची सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास नाकात मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकावे. यामुळे अँटीबॅक्टेरियल घटक जंतू नष्ट करून टाकतात. नाकातील मार्ग ओलसर कायमच ओलसर राहतो. याशिवाय तुम्हाला जर सायनस, अॅलर्जी आणि वारंवार होणाऱ्या सर्दीपासून कायमचा आराम मिळवायचा असेल तर नियमित एक किंवा दोन थेंब तेल नाकात टाकावे.
थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या काढ्याचे सेवन करावे. काढ्याच्या सेवनामुळे शरीरत्व साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. काढा बनवण्यासाठी सुंठ, काळी मिरी आणि पिपळी इत्यादी पदार्थांचा वापर करावा. मिक्सरच्या भांड्यात सुंठ, काळी मिरी आणि पिपळी टाकून बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर पाण्यात टाकून व्यवस्थित गरम करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध मिक्स करून सेवन करा. यामुळे घशात वाढलेली खवखव कमी होते, कफ पातळ होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
Ans: हिवाळ्यात सामान्यतः सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, दमा, सांधेदुखी आणि श्वसनसंस्थेचे आजार (उदा. न्यूमोनिया) होण्याचा धोका असतो.
Ans: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात फळे, भाज्या, सुकी फळे (ड्राय फ्रुट्स), आणि कडधान्ये यांचा समावेश करावा. तसेच, पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे.
Ans: शरीराला उबदार ठेवण्यासाठी डिंक, अळीव (Garden cress seeds), मेथीचे लाडू, खजूर, गूळ, आणि शेंगदाणे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. आले आणि हळदीचा वापर देखील फायदेशीर ठरू शकतो.






