रात्री खाल्लेल्या 'या' पदार्थांमुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका
लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या घाणीचा परिणाम संपूर्ण शरीराच्या कार्यावर होतो. फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, लिव्हर कॅन्सर इत्यादी गंभीर आजार होतात. लिव्हरसबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे इतर आजारांची लागण होते. रात्री जेवणानंतर किंवा जेवणनधी अनेकांना गोड किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. हे पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक तोटे होतील.
रात्रीच्या तळलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. कारण या पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साचून राहते. समोसे, पुरी, पकोडे किंवा तळलेले भात खाल्ल्यामुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. जेवणानंतर सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. गोड पदार्थांचे सेवन केल्याशिवाय अजिबात झोप येत नाही. पण असे न करता रात्री अजिबात गोड पदार्थ खाऊ नये. अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि मधुमेह होण्याची शक्यता असते.
लिव्हरचे आजार प्रामुख्याने अल्कोहोल किंवा सोडा प्यायल्यामुळे होतात. सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होऊन पोटात पाणी होते. यामुळे पोटाला सूज येणे किंवा पोटात तीव्र वेदना होऊ लागतात. रात्रीच्या वेळी अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे जास्त मसालेदार किंवा तळलेले मांसाहारी पदार्थ अजिबात खाऊ नये. यामुळे पचनक्रिया मंदावते. तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नये. झोपल्यानंतर खाल्ले अन्नपदार्थ पचन होत नाही, ज्यामुळे ऍसिडिटी वाढते.
Health Care : तुम्हाला सतत अॅसिडीटी होतेय का ? मग लाईफस्टाईलमधल्या ‘या’ छोट्या चुका आजच टाळा
Ans: यकृतामध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होणे म्हणजे फॅटी लिव्हर. सामान्यतः यकृताच्या वजनाच्या 5 % 5 % ते 10 % 1 0 % चरबी असते; जेव्हा ही चरबी वाढते तेव्हा फॅटी लिव्हर होतो.
Ans: अतिरिक्त वजन, मधुमेह, जास्त कोलेस्ट्रॉल, जास्त मद्यपान आणि कमी शारीरिक हालचाल ही फॅटी लिव्हरची प्रमुख कारणे आहेत.
Ans: ग्रेड 2 आणि 3 मध्ये थकवा, ओटीपोटात अस्वस्थता आणि उजव्या बाजूला वरच्या भागात पोट जड वाटणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.






