
काळे मनुके दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले बदाम किंवा मनुके खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती पूर्ण्पणारे कमकुवत होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या खाण्याऐवजी आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करावे, जे पदार्थ खाल्ल्याने पोटही भरेल आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील. ड्रायफ्रुटस्मध्ये काळ्या मनुका खाण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टरसुद्धा देतात. काळ्या मनुकांमध्ये असलेले विटामिन सी आरोग्यसाठी फायदेशीर आहे. पण काळ्या मनुका नुसत्याच खाण्याऐवजी त्या दुधात टाकून खाल्ल्या तर पचनक्रिया सुधारते. तसेच पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. काळे मनुके तुम्ही पाण्यात सुद्धा भिजवून खाऊ शकता , पण दुधात भिजवून खाल्ल्यामुळे आरोग्याला जास्त फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काळे मनुका दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
काळे मनुके दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो. तसेच पचनक्रिया सुधारते. मनुक्यांमध्ये फायबर आढळून येते, ज्यामुळे आतड्यांमधून अन्नपदार्थ सहज पचण्यासाठी मदत करते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित दुधातून मनुक्यांचे सेवन करावे.
हाडांच्या मजबूत आरोग्यसाठी दुधातून मनुक्यांचे सेवन करावे. हाडांच्या मजबूत वाढीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम मनुक्यांमध्ये असते. दुधात भिजवलेले मनुके खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होऊन हाडांचे दुखणे थांबते.
हे देखील वाचा: मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी ‘अशा’ प्रकारे करा लसणीचा वापर, काही दिवसांमध्ये दिसेल फरक
वजन वाढवण्यासाठी अनेक लोक खूप प्रयत्न करतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी दुधामध्ये भिजवलेले मनुके खावे. मनुक्यांमध्ये असलेले कॅलरीज वजन वाढवण्यासाठी मदत करते. काळे मनुके खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
काळे मनुके दुधात भिजवून खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच मनुके खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच अशक्तपणा कमी होते. अनेक महिला सहजपणे ॲनिमियाच्या बळी पडतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मनुके खावेत. तसेच यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
हे देखील वाचा: तोंडाला सतत दुर्गंधी येते? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दुर्गंधीपासून मिळेल सुटका
मनुक्यांमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. मनुक्यांमध्ये आढळून येणारे फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.मनुके खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.