Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! शारीरिक संबंधांदरम्यान ब्लिडिंगकडे करू नका दुर्लक्ष, चुकीमुळे गेला मुलीचा जीव

Bleeding During Physical Intercourse: गुजरातमधून एक वेदनादायक आणि धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. लैंगिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव होण्याचे धोके काय आहे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका नर्सिंग विद्यार्थीनीचा शारीरिक संबंधादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे, जाणून घेऊया अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 01, 2024 | 03:03 PM
शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्राव झाल्याने गेला मुलीचा जीव

शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्राव झाल्याने गेला मुलीचा जीव

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना आता समोर आलीये. एका नर्सिंग विद्यार्थिनीचा शारीरिक संबंधादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. पोलीस तपासात असे समोर आले आहे की विद्यार्थिनीला जास्त रक्तस्त्राव होत असतानाही तिचा 26 वर्षीय प्रियकर तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तासनतास फोनवर या समस्येवर घरगुती उपाय शोधत राहिला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. 

या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून यावर आता सगळीकडे चर्चा चालू झाली आहे. दरम्यान शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्राव झाल्यानंतर त्वरीत डॉक्टरांकडे जाणं किती गरजेचे आणि आवश्यक आहे याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया. त्याआधी नेमकं प्रकरण काय हेदेखील जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

काय आहे नेमके प्रकरण

शारीरिक संबंध ठेवताना काय घ्यावी काळजी

पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली की आरोपी तरुणाने इंटरनेटवर ‘शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग’ हा विषय शोधण्यात बराच वेळ वाया घालवला होता. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांशी संपर्क साधला आणि पीडितेला खासगी वाहनातून रुग्णालयात त्याने नेले. मात्र त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. नवसारीचे SP सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, ‘फॉरेन्सिक अहवालानुसार विद्यार्थिनीचा मृत्यू हा जास्त रक्तस्त्रावामुळे झाला आहे. तिला वेळीच तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती तर तिचे प्राण वाचू शकले असते.’ 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय सांगितले?

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा होत्या, ज्यामुळे तिला जास्त रक्तस्त्राव झाला आणि शेवटी रक्तस्त्रावाच्या शॉकमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंधादरम्यान विद्यार्थिनीला रक्तस्त्राव होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आल्यानंतरही त्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी हॉटेलमध्ये जवळपास 60 ते 90 मिनिटे घालवली. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी विद्यार्थिनीला मृत घोषित केले.

हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा

शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव का होतो?

रक्तस्राव होण्याची कारणे काय आहेत

शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव अनेक कारणांमुळे होऊ शकतो, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी काही कारणे सांगितली आहेत, आपण जाणून घेऊया 

  • संसर्ग: योनीमार्गात संसर्ग झाल्यास, शारीरिक संभोग करताना रक्तस्त्राव होऊ शकतो
  • दुखापत: शारीरिक संभोग करताना कोणतीही दुखापत झाल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो
  • हार्मोनल असंतुलन: हार्मोनल असंतुलनामुळे देखील रक्तस्त्राव होऊ शकतो
  • इतर आरोग्य समस्या: गर्भाशयाचा कर्करोग, पॉलीप्स किंवा फायब्रॉइड यासारख्या इतर आरोग्य समस्यांमुळे देखील रक्तस्त्राव होऊ शकतो.

हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर

अशा परिस्थितीत काय करावे?

कोणती आणि कशा पद्धतीने काळजी घ्यावी

संभोगादरम्यान रक्तस्त्राव होत असल्यास, या उपायांचा अवलंब करा

  • घाबरू नका आणि लगेच शारीरिक संबंध करणे थांबवा आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टर किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाशी संपर्क साधा
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका
  • स्वत:ला विश्रांती द्या आणि पुरेसे पाणी प्या
  • स्वच्छतेची काळजी घ्या आणि संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करा

शारीरिक संबंधांदरम्यान रक्तस्त्राव होणे एक गंभीर समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे हे जीवावर बेतू शकते. तुम्हाला अशी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय सुरक्षित शारीरिक संबंध राहतील याची काळजी घ्या आणि आरोग्याची नियमित तपासणी करा 

Web Title: Bleeding during physical intercourse do not ignore mistake death of nursing student due to mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • crime news
  • Health News
  • Physical Intercourse

संबंधित बातम्या

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
1

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ
2

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
3

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक
4

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.