Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bones Health: फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे, ‘या’ रोजच्या सवयीही हाडांना करतात कमकुवत

Weak Bones Reasons: हाडांशी संबंधित समस्येमागे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेला कारणीभूत नसते. तज्ज्ञांच्या मते आहार, जीवनशैली आणि काही चुकीच्या सवयींमुळेही हाडांची ताकद कमी होऊन विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 02, 2026 | 05:20 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • फक्त कॅल्शियमची कमतरता नव्हे
  • या दैनंदिन सवयीही हाडांना बनवू शकतात कमकुवत
  • हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय कराल?
आजकाल केवळ ज्येष्ठांनाच नव्हे, तर तरुणांनाही हाडांशी संबंधित समस्येचा त्रास होत आहे. हाडे दुखणे, अशक्तपणा, थकवा किंवा किरकोळ धक्क्यात फ्रॅक्चर होणे यासारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. अनेकजण यामागे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेला जबाबदार मानतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हाडांचे आरोग्य केवळ कॅल्शियमवर अवलंबून नसून दैनंदिन जीवनशैली, आहार, व्यायाम आणि इतर अनेक सवयींचाही त्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे हाडे आयुष्यभर मजबूत ठेवण्यासाठी योग्य सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या सवयींमुळे हाडं कमकुवत होतात, जाणून घ्या.

पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात? ताज्या ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

या सवयी हाडांना कमकुवत करू शकतात

दिवसभर एकाच जागी बसून राहणे किंवा शारीरिक हालचाल कमी असणे हाडांच्या घनतेवर परिणाम करू शकते. तसेच धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी शरीरातील कॅल्शियमचे संतुलन बिघडवू शकतात. सूर्यप्रकाशात पुरेसा वेळ न घालवल्यास शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी कमी मिळते, ज्यामुळे कॅल्शियमचे शोषणही व्यवस्थित होत नाही. याशिवाय, संतुलित आहाराचा अभाव आणि काही औषधांचा दीर्घकाळ वापर यांचाही हाडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय कराल?

दररोज किमान काही वेळ चालणे, जिने चढणे किंवा वजनासह व्यायाम करणे फायदेशीर ठरते. सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ घालवल्यास शरीराला नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. धूम्रपान व मद्यपान टाळण्याबरोबरच पुरेशी झोप आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

आहारात या पदार्थांना द्या प्राधान्य

दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, रागी, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनांनी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा. यासोबत पुरेसे पाणी पिणे आणि शरीराचे वजन संतुलित ठेवणेही आवश्यक आहे. कोणतेही कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

हाडांचे आरोग्य केवळ एका पोषक घटकावर अवलंबून नसते. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेसा सूर्यप्रकाश आणि निरोगी सवयी यांचा एकत्रित परिणाम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे आजपासूनच जीवनशैलीत छोटे बदल करून भविष्यातील हाडांच्या समस्या टाळले जाऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Couple Travel: गर्लफ्रेंडसोबत ट्रिप प्लॅन करताय? सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका

Web Title: Bone health weak bones causes calcium vitamin d lifestyle diet prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • health care news
  • Healthy Foods
  • strong bones
  • vitamin d

संबंधित बातम्या

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला
1

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा
2

३५ वर्षीय महिलेच्या ‘झटक्यां’मागे आढळला दुर्मिळ ऑटोइम्यून मेंदूविकार; किम्स हॉस्पिटलमध्ये वेळेत निदानामुळे प्रकृतीत सुधारणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.