(फोटो सौजन्य: Pinterest)
हाडांची मजबुती आणि दातांचे आरोग्य
अननसात मॅगनीज मुबलक प्रमाणात असते. हाडांच्या विकासाती आणि मजबुतीमध्ये मॅगनीज महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय, दररोज एक ग्लास अननसाचा रस प्यायल्याने दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
अननसात व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेन नावाचे घटक असतात. यामध्ये अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
अननसात फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यातील पोषक घटकांमुळे शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते.
पचनसंस्थेसाठी उत्तम
अननस हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. यातील ‘ब्रोमेलेन’ है घटक पोटातील ऐसिब्बर नियंत्रण देवतात, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते, आतडचांचे आरोग्य जपले जाते आणि ऍसिडिटीचा त्रास कमी होती.
हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण
या फळामध्ये असणारी अँटीऑक्सिडंट्स बैंड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ‘ब्रोमेलेन ‘मुळे रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठण्याची शक्यता कमी होते, परिणामी हृदयविकाराचा धोका टळतो,
काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर
कॅन्सरपासून बचाव
अनेक संशोधनांनुसार, अननसाचे नियमित सेवन कॅन्सरचा धोका कमी करू शकते. यातील ब्रोमेलेन चटक विशेषतः ‘कोलोरेक्टल कैन्सर’ आतड्याचा कॅन्सर) पासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करतात.
सौंदर्यवर्षक गुणधर्म
अननसाला बिटा कॅरोटीनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. यामुळे त्वचा, केस आणि नखे यांना नैसर्गिक झळाळी प्राप्त होते आणि शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






