Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे, अन्यथा शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 07:54 AM
शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते?
साखरेची पातळी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
मधुमेह कशामुळे होतो?

दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आपल्यातील अनेकांना कायमच सतत गोड पदार्थ खाण्याची सवय असते. वारंवार गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण यामुळे शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी अनेक लोक कडू कारल्याचा रस, मेथी दाण्यांचे पाणी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. पण काहीवेळा जेवण वगळल्यामुळे किंवा शरीराला आवश्यक तेवढा आहार न मिळाल्यामुळे साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते आणि शरीरात विविध लक्षणे दिसू लागतात. याला हायपोग्लायसेमिया असे सुद्धा म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

मधुमेहाच्या उपचारादरम्यान प्रमाणापेक्षा जास्त इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणारी औषधे घेतल्यामुळे सुद्धा रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन जाते. नेहमीपेक्षा जास्त किंवा विनाकारण जास्त शारीरिक श्रम कामे केल्यामुळे स्नायू जास्त साखरेचा वापर करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते. यकृत, मूत्रपिंड किंवा स्वादुपिंडाचे गंभीर आजार असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कधीही कमी होऊन जाते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची लक्षणे:

रक्तातील साखरेची पातळी काहीवेळा हळूहळू कमी होते तर काहीवेळा झपाट्याने कमी होण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये सौम्य अशक्तपणा, घाम येणे किंवा चक्कर येणे यांसारखी विविध लक्षणे दिसून येतात. पण योग्य वेळी उपचार न केल्यास शारीरिक स्थिती गंभीर होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर शरीर ॲड्रेनालाईन स्रवते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते आणि थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

तसेच अचानक भूक लागणे, डोके हलके वाटणे किंवा पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. अचानक आलेला राग, चिंता, तणाव शरीरात उष्णता नसताना मानेच्या मागच्या बाजूला, अचानक थंड घाम येऊ लागणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मेंदूला पुरेसे ग्लुकोज न मिळाल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरातील साखरेची पातळी कमी होणे म्हणजे काय?

    Ans: रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा कमी होण्याला हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia) म्हणतात. साधारणपणे 70 mg/dL पेक्षा कमी रक्तातील साखर कमी मानली जाते.

  • Que: रक्तातील साखर कमी होण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: जेवण उशिरा करणे किंवा न करणे, जास्त व्यायाम, मधुमेहावरील काही औषधे किंवा इन्सुलिनचा परिणाम, मद्यपान तसेच काही आरोग्य समस्यांमुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते.

  • Que: साखर कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: थरथर होणे, घाम येणे, अचानक भूक लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा, हृदयाची धडधड वाढणे, चिडचिड किंवा गोंधळ अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: What causes blood sugar levels to drop do not ignore these symptoms appearing in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास
1

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
2

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
3

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
4

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.