Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा

Chana Dal palak Chilla Recipe: तुम्हालाही दररोजच्या नाश्त्यासा काय बनवायचं हे सुचत नाही तर मग चणा डाळ आणि पालकाचा पौष्टिक चीलाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 08:59 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यासाठी पोहे-उपमा विसरा
  • नवा चणा डाळ आणि पालकाचा चीला
  • चविष्ट आणि पौष्टिक पर्याय
सकाळच्या नाश्त्यात चविष्ट पदार्थ खाण्यासोबतच शरीराला पोषण मिळणेही महत्त्वाचे आहे. रोजच्या पोळी, पोहे किंवा उपम्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि पौष्टिक खायचे असेल, तर चणा डाळ आणि पालकाचा चीला हा एकदा नक्की ट्राय करुन पाहा. चणा डाळीमुळे प्रथिने मिळतात, तर पालकामुळे आहारात हिरव्या पालेभाजीचा समावेश होतो. ही रेसिपी कमी वेळात झटपट तयार होते आणि सकाळच्या व्यस्त वेळापत्रकातही सहज बनवता येते. चला तर जाणून घेऊयात चणा डाळ आणि पालकाचा पौष्टिक चीलाची रेसिपी.

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

साहित्य

  • १ कप -चणा डाळ
  • एक ते दीड कप – ताजा पालक
  • १ते २ हिरवी मिरची
  • छोटा तुकडा – आले
  • अर्धा चमचा- जिरे
  • चिमूटभर हिंग
  • मीठ
  • पाणी
  • चीला भाजण्यासाठी तेल
  • बारीक चिरलेला कांदा

कृती

सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुऊन साधारण काही तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ चांगली मऊ झाल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्या. यानंतर, पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. मिक्सरमध्ये पालक, हिरवी मिरची आणि आले घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट वाटलेल्या चणा डाळीत मिसळा. यानंतर, डाळ आणि पालकाचे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात जिरे, हिंग, मीठ आणि आवश्यक असल्यास बारीक चिरलेला कांदा घाला. थोडे पाणी टाकून मिश्रण थोडे घट्ट फेटून घ्या. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता, तवा मंद आचेवर चांगले गरम करून त्यावर थोडे तेल पसरवा. आता तयार मिश्रणाचा एक गोल चमचामध्ये घ्या आणि तव्यावर टाकून गोलाकार पसरवा. चीला मध्यम आचेवर भाजू द्या. खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत होऊ लागली की त्यावर थोडे तेल सोडून चीला सावधपणे उलटा. दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्या. चीला दोन्ही बाजूंनी हलका कुरकुरीत झाला की तव्यावरून काढा. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे चीले तयार करा. गरमागरम चणा डाळ आणि पालकाचा चीला हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा. चवदार आणि पौष्टिक नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.

टीप : डाळ भिजवण्याचा वेळ आणि मिश्रणाची जाडी यानुसार चीला मऊ किंवा कुरकुरीत होऊ शकतो.

Transparent Phone Cover: पिवळा पडलेला फोन कव्हर फेकू नका, वापरा ‘या’ सोप्या टिप्स; काही मिनिटांत होईल चकाचक

Web Title: Chana dal palak chilla recipe healthy breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
1

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
2

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
3

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
4

Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.