Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत… हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

Chand Baori : राजस्थानमधील एक प्राचीन आणि आकर्षक ठिकाण आपल्या अनोख्या रचना आणि सौंदर्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांची शूटिंग पार पडली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 09:01 AM
भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत... हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत... हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

Follow Us
Follow Us:
  • या ठिकाणाची वास्तुकला आणि भौमितिक रचना पर्यटकांना खूप आकर्षित करते.
  • ऐतिहासिक महत्त्वासोबतच याचा उपयोग पाणी साठवण्यासाठीही केला जात होता.
  • अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग येथे झाल्यामुळे याला विशेष ओळख मिळाली आहे.
अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेली सुंदर ठिकाणे आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांना पाहून आपल्यालाही वाटतं की आपणंही या ठिकाणी जाऊन चांगले फोटो काढावेत. राजस्थान भारतातील एक असे राज्य आहे जिथे भव्य वास्तुकला, किल्ले, राजवाडे आणि अद्वितीय मंदिर पाहायला मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील एका अशा ठिकाणाची माहिती सांगत आहोत जे लोकांच्या नजरेपासून दूर एक सुंदर असे ठिकाण आहे. रोजच्या गजबटापासून दूर तुम्हाला एका शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. अलीकडेच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे. आपल्या पोस्टमध्ये, आनंद महिंद्रा यांनी या प्राचीन पायऱ्यांच्या विहिरीचे वर्णन केवळ एक स्मारक नसून, दगडात कोरलेला एक विचार असे केले आहे. ते म्हणतात की, जरी लोक राजस्थानच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांकडे आकर्षित होत असले तरी, या ठिकाणाची त्याच्या भौमितिक सौंदर्यामुळे आणि रचनेमुळे एक वेगळी ओळख आहे.

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

१००० वर्षे जुनी अद्भुत रचना

हे ठिकाण आभनेरी गावात असलेली चांद बाओरी आहे. ही विहिर निकुंभ घराण्याचे राजे चंद ८व्या आणि ९व्या शतकात बांधली होती. सुमारे ३० मीटर खोल असलेली ही पायऱ्यांची विहिर १३ मजली असून त्यात अचूक समरुपतेने बांधलेल्या अंदाजे ३,५०० पायऱ्या आहेत. ही रचना पहिल्याच नजरेत लक्षवेधी आहे. तिचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. वरुन पाहिल्यास, पायऱ्यांशी रचना एका उलट्या पिरॅमिडसारखी दिसते ज्यामुळे एक दृष्टिभ्रम निर्माण होतो जो पर्यटकांना मोहित करतो.

केवळ सौंदर्यच नव्हे, तर उपयुक्तताही

चांद बाओरी ही विहिर फक्त दिसायलाच सुंदर नाही तर एक अत्यंत उपयुक्त अशी वास्तू देखील आहे. राजस्थानच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात हंगामया प्रदेशात पाण्याची टंचाई ही नेहमीच एक मोठी समस्या राहिली आहे. अशात पायऱ्यांची ही विहिर पावसाचे पाणी साठवण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. येथे पाणी साठवून दिर्घ काळासाठी वापरले जात असे. शिवाय, तिच्या खोलीमुळे आणि रचनेमुळे सभोवलतालचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते. यामुळे हे ठिकाण फक्त एक जलाशय नसून हवामानाचे संतुलन राखण्यासाठी एक प्रमुख उपयुक्त असे केंद्र बनले आहे.

चित्रपटांचे झाले आहे शूटिंग

चांद बाओरीचे साैंदर्य केवळ पर्यटकांपुरते मर्यादित नाही, तर त्याने चित्रपटसृष्टिलाही आपलं वेड लावलं आहे. हे ठिकाण ‘पहेली’ आणि ‘भूल भुलैया’ या बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसून आलं आहे. त्याचबरोबर ‘द डार्क नाईट राइझेस’ आणि ‘द फॉल’ या हॉलिवूड चित्रपटांचीही इथे शूटिंग झाली आहे.

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

कसं जायचं इथे?

जयपूरपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या या पायऱ्यांच्या विहिरीला तुम्ही सहज भेट देऊ शकता. याच्या जवळच हर्षत माता मंदिर आहे जिथे भाविक प्रार्थना करण्यापूर्वी चांद बाओरीला भेट देतात. हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही तर त्या काळातील विचार आणि अभियांत्रिकीचे एक भव्य उदाहरण आहे. हा एक लपलेला खजिना आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Web Title: Chand baori rajasthan hidden stepwell famous movie shooting location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Film Shooting
  • rajasthan
  • travel news

संबंधित बातम्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
1

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
2

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
3

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
4

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.