(फोटो सौजन्य: istock)
देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली
तवांग
सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून या सीजनमध्ये उष्णता भरपूर वाढते. याकाळात बहुतेक लोकांचा कल हा थंड ठिकाणी भेट देण्याकडे जास्त असतो. त्यातही जर ठिकाण नैसर्गिक असेल तर प्रवासाचा अनुभव आणखीनच मजेदार बनतो. तुम्हालाही निसर्गाने भरलेल्या शांत आणि थंड ठिकाणी भेट द्यायची असेल तर आसामधील तवांग हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. आसाममधील तेजपूर रेल्वे स्टेशनवर उतरून बसने तवांगला पोहचता येते. इथे बसचे भाडे २०० रुपये आहे. निवास आणि जेवणाचा खर्च अंदाजे ३००० रुपयांपेक्षा जास्त येत नाही. तुम्ही गुवाहाटीपासून विमानाने देखील प्रवास करु शकता.
कौसानी
हे सुंदर ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे एक छोटंस थंड हवेचं ठिकाण आहे जिथे निसर्गसाैंदर्याचा अद्भूत अनुभव घेता येतो. तुम्ही मुंबईहून इथे जात असाल तर त्यासाठी थेट रेल्वेचा मार्ग उपलब्ध नाही. यासाठी प्रथम तुम्हाला मुंबईहून काठगोदाम पर्यंत ट्रेन पकडावी लागेल आणि पुढे तेथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने काैसानीला जाऊ शकता. इथे एक दिवसाचा खर्च १५०० रुपये आहे.
हेमिस
हे लेह तहसीलमध्ये वसलेले एक साधे आणि सुंदर ठिकाण आहे. मनाली ते लेह ट्रक प्रवासाला फक्त ५०० रुपये लागतात. येथे जेवण आणि राहण्याचा खर्च फार कमी असून तो परवडणाराही आहे. एक साधा अनुभव हवा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
कुल्लू
चार ते पाच दिवसांच्या ट्रिपची मजा घ्यायची असेल तर कुल्लु तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे ५००० रुपयांपेक्षा कमी खर्चात चार ते पाच दिवसांची सहल पूर्ण करता येते. मुंबईहून कुल्लूला (हिमाचल प्रदेश) थेट ट्रेन नाही. सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे मुंबईहून दिल्ली (Delhi) पर्यंत ट्रेनने जाणे आणि तिथून कुल्लूसाठी बस किंवा टॅक्सी घेणे.






