
शेफ विष्णू मनोहर स्पेशल रेसिपी! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चमचमीत मसाला पापड
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच पापड खायला खूप जास्त आवडतो. जेवणाच्या ताटात कायमच पापड असतो. याशिवाय हॉटेलमध्ये गेल्यानंतर कायमच मसाला पापड मागवला जातो. वेगवेगळे मसाले आणि कांदा टोमॅटोचा वापर करून बनवलेला मसाला पापड चवीला अतिशय चविष्ट लागतो. याशिवाय हॉटेलमध्ये बनवला जाणारा पापड अजिबात वाकडा तिकडा नसतो. पण घरी बनवताना पापड पूर्णपणे फोल्ड होऊन जातो. ज्यामुळे त्यावर कांदा टोमॅटो राहत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी मसाला पापड बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत. या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही मसाला पापड बनवू शकता. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होणारे पदार्थ बनवला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया मसाला पापड बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)