आंबवलेले पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच वेगवेगळे चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये मसूर डाळीचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसूर डाळ पचनास अतिशय हलकी असते. डोसा बनवण्यासाठी कायमच उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घेतले जातात. भिजवलेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार केली जाते. तयार केलेले मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवले जाते. त्यानंतर व्यवस्थित डोसा बनवला जातो. या प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागतो. याशिवाय अनेकांना आंबट पदार्थ खायला आवडत नाही. अशावेळी कमीत कमी साहित्यात मसूर डाळीचा डोसा बनवू शकता. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत मसूर डाळीचा डोसा अतिशय चविष्ट लागेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
पास्ता बनवायला अवघड वाटतो? मग १५ मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट Red Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी






