Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

छातीमध्ये इन्फेक्शन वाढल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया छातीमध्ये इन्फेक्शन कशामुळे वाढते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 11:25 AM
वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

Follow Us
Follow Us:

मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना ९३ वर्षीय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने निधन झाले. त्यांना दाखल केले तेव्हा हृदयाचा झटका आला अशी चर्चा होती, मात्र छातीतील संसर्गही कारण पुढे आले. या पार्श्वभूमीवर ‘छातीतील संसर्गे’ वयोमानानुसार धोकादायक ठरतो हे स्पष्ट होत आहे. यावर बोलताना शिवडी टीबी रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आंतरराष्ट्रीय श्वसन रोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले की, छातीतील संसर्ग म्हणजे फुफ्फुस आणि श्वसनमार्गावर होणारा संसर्ग होय. हा प्रामुख्याने विषाणू (व्हायरल इन्फेक्शन) किंवा जिवाणूंमुळे होतो.(फोटो सौजन्य – istock)

Asha Bhosle Passes Away: जेष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, शरीरसंबंधित ‘या’ गंभीर आजाराने होत्या त्रस्त

छातीतील संसर्ग प्रकार:

ब्रॉन्कायटिस: श्वसननलिकांमध्ये सूज येते. सतत खोकला, कफ, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे दिसतात.
निमोनिया: अधिक गंभीर स्थिती. फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो, ऑक्सिजनची पातळी घसरते आणि रुग्णाची प्रकृती झपाट्याने खालावू शकते.

धोक्याची लक्षणे कोणकोणती?

सतत खोकला (कोरडा किंवा कफयुक्त)
छातीत जडपणा किंवा वेदना
श्वास घेण्यास त्रास
थकवा, अशक्तपणा
ताप, थंडी वाजणे
पिवळा/हिरवा कफ
योग्य काळजी घेणे आवश्यक
६० वर्षांवरील व्यक्ती, लहान मुले आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यासाठी वेस्ट इन्फेक्शन गंभीर ठरू शकते. वेळेत उपचार न झाल्यास सायलेंट किलर’ ठरू शकते.

रोगप्रतिकारशक्ती राखण्याचा दिला सल्ला

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असल्यामुळे त्यांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. सुरुवातीला ही लक्षणे साध्या सर्दी-खोकल्यासारखी वाटतात जसे की खोकला, ताप, थकवा किवा श्वास घेण्यास त्रास, पण वेळेवर उपचार न घेतल्यास हा संसर्ग वाढून फुफ्फुसांवर परिणाम करतो. गंभीर अवस्थेत फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन शरीरातील ऑक्सिजनची पातळी घटते, ज्यामुळे रेस्पिरेटरी फेल्युअर (श्वसन अपयश) होऊ शकते. यामुळे हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक किंवा कार्डिएक अरेस्टचा धोका वाढत असल्याचे डॉ ननावरे म्हणाले.

आशा ताईंना गायनासोबतच होती पाककलेची आवड! रिकाम्या वेळेत स्वतः बनवण्याच्या ‘हे’ चविष्ट पदार्थ

लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटामिन ‘सी’युक्त आहार घ्यावा, पुरेशी विश्रांती घ्यावी आणि स्वतःहून औषधे घेण्याचे टाळावे.ही घटना केवळ एका दिग्गज कलावंताच्या निधनापुरती मर्यादित नसून, चेस्ट इन्फेक्शनसारख्या ‘साध्या’ वाटणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकते, याची तीव्र जाणीव करून देणारी आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chest infections after 60 can be life threatening respiratory experts urge timely treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Health Check Up
  • health issue
  • heart problems

संबंधित बातम्या

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार
1

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग
2

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.